विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये होणार असून ते २८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर राज्याची काही प्रमाणात आर्थिक रणनीती ठरणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी प्रजासत्ताकदिनी पुण्यात केले होते.
महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची घोषणा करून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिवेशनासाठी काही कालावधी शिल्लक असताना अद्याप प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नव्हत्या. वरिष्ठ पातळीवरही बांधकाम विभागाची एकही बैठक झालेली वृनव्हती. त्यामुळे अधिवेशनाची घोषणा फक्त राजकीय ठरणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.