जिल्हा परिषदांच्या शाळांमधून पहिली व दुसरीसाठी आंतरराष्ट्रीय धर्तीवर अभ्यासक्रम

जिल्हा परिषदांच्या शाळांमधून यापुढे पहिली व दुसरीसाठी आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून जिल्हा परिषदांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर शिक्षण देणार आहोत. पहिली दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदलानंतर नवा अभ्यासक्रम कसा असेल, हे पाहावे लागणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाववरून वाद निर्माण केला जातो. त्यामुळे मुलांना थोर पुरुषांच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार आहे.”