अभिनेते गणेशपुरेंचा मोबाईल चोरीला

चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांनी फेसबुकद्वारे थक्क करणारा अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला आहे. माझ्या चुकीमुळे जे झाले ते तुमच्याबरोबर होऊ नये याची खबरदारी घ्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ते म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळल्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली होती.
या संधीचा फायदा घेत काही चोरट्यानी मदत हवी असे सांगून माझा मोबाईल चोरला. मी गाडीचा दरवाजा उघडला नसता तर माझा मोबाईल चोरीला गेला नसता. माझ्या चुकीमुळे माझ्याबरोबर असे घडले पण तुम्ही काळजी घ्या. अशा घटना घडतात तेव्हा सावध रहा. कोणी काहीही सांगितले तरी विश्वास ठेवू नका. असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.