गेल्या 24 तासात 1,94,720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या  85  लाखांहून अधिक  (85,26,240) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  लसीकरण व्याप्तीने  153.80 कोटी (1,53,80,08,200) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,64,73,522 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,89,399
2nd Dose 97,56,646
Precaution Dose 9,19,729
FLWs 1st Dose 1,83,87,898
2nd Dose 1,70,01,530
Precaution Dose 4,90,048
Age Group 15-18 years 1st Dose 2,82,74,847
Age Group 18-44 years 1st Dose 51,82,89,584
2nd Dose 35,80,10,162
Age Group 45-59 years 1st Dose 19,66,15,970
2nd Dose 15,78,39,633
Over 60 years 1st Dose 12,25,47,749
2nd Dose 9,90,09,067
Precaution Dose 4,75,938
Precaution Dose 18,85,715
Total 1,53,80,08,200

 

गेल्या 24 तासांत 60,405 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 3,46,30,536 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा  दर  96.01% इतका आहे.

 गेल्या 24 तासात 1,94,720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या  9,55,319 आहे.देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण  2.65% आहे.

 

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 17,61,900  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 69.52 कोटींपेक्षा जास्त  (69,52,74,380) चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  9.82% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 11.05%.नोंदविण्यात आला आहे.