भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 7,23,619
गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 29 लाखांहून अधिक (29,60,975) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 151 कोटी 94 लाखांचा (1,51,94,05,951) टप्पा ओलांडला आहे.
देशभरात 1,62,26,792 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे :
HCWs |
1st Dose | 1,03,88,899 |
2nd Dose | 97,42,727 | |
FLWs |
1st Dose | 1,83,87,219 |
2nd Dose | 1,69,75,052 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 2,38,07,879 |
Age Group 18-44 years |
1st Dose | 51,45,68,195 |
2nd Dose | 35,25,37,574 | |
Age Group 45-59 years |
1st Dose | 19,61,86,714 |
2nd Dose | 15,63,00,659 | |
Over 60 years |
1st Dose | 12,23,10,994 |
2nd Dose | 9,82,00,039 | |
Total | 1,51,94,05,951 |
गेल्या 24 तासात 46,569 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. त्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,45,00,172 झाली आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 96.62% झाला आहे.
गेल्या 24 तासांत, 1,79,723 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली.
भारतातील कोविड सक्रिय (उपचाराधीन) रुग्णसंख्या सध्या 7,23,619 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रिय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 2.03% आहे.
कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 13,52,717 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 15 लाखांहून अधिक (69,15,75,352) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 7.92% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 13.29% इतका आहे.