राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना गेल्या काही महिन्यांपासून सक्तीने वीज बिलवसुली सुरु केली आहे. त्यातच भर म्हणून आता थकीत वीज बिलापोटी कृषीपंपाचे पॅनेल, स्टार्टर बॉक्स, विद्युत जोडणीची केबल सक्तीने काढून नेण्याचे काम महावितरणचे अधिकारी करत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
आमदार कुल म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर सुरु असलेली कृषीपंपाचे स्टार्टर, पॅनेल बॉक्स व विद्युत वाहक तारा काढून नेण्याची कारवाई तात्काळ थांबविणेबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. उपमुख्यमंत्री अजित पवार , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे आमदार कुल यांनी सांगितले.