डाळिंब पिकावर रोग व कीड नियंत्रण

सध्या सूरु असलेल्या पावसामुळे व सततच्या ढगाळ वातावरणामूळे डाळिंब पिकावर बुरशीजन्य, जीवाणूजन्य रोग व विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभुमीवर महात्मा फुले कृषि विद्यापीठाने सर्व शेतकर्‍यांना विद्यापीठाच्या तसेच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या शिफारशीप्रमाणे बागेमध्ये बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग व विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

  • जीवाणूजन्य (तेल्या) रोग व बुरशीजन्य ठिपक्याच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन किंवा 2-ब्रोमो 2-नायट्रो प्रोपेन 1,3 डायोल (ब्रोमोपॉल) (0.5 ग्रॅ.) + कॉपर हायड्रॉक्साईड 77 डब्ल्यु पी. (2.5 ग्रॅ./लि.)
  • किंवा कॅप्टन 50 डब्ल्यु पी. (2 ग्रँ./लि.) + स्टीकर (0.5 मि.ली./ली.) ची एकत्रीत फवारणी करावी
  • जीवाणूजन्य (तेल्या) रोगाची तीव्रता जास्त असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 50 डब्ल्यु पी. किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 77 डब्ल्यु पी. (2.5 ग्रॅ./ली.) + ब्रोनोपॉल (0.5 ग्रँ./ली.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (0.5 ग्रँ./ली.) यांची एकत्रीत फवारणी पाच दिवसांच्या अंतराने करावी.
  • पानावरील बुरशीजन्य ठिपक्याच्या नियंत्रणासाठी प्रोपीनब 3 ग्रँ./ली. पाणी व त्यापाठोपाठ 7 दिवसांच्या अंतराने अ‍ॅझोक्सीस्ट्रोबीन 1 मि.ली./ली. पाण्यात5 मि.ली. स्टीकर मिसळून फवारणी करावी.
  • फळकुज, स्कॅब, अल्टरनेरीया नियंत्रणासाठी डायफेनकोनॅझोल 1 मि.ली./ली. किंवा किटाझीन 1 मि.ली./ली. पाण्यात स्टीकर मिसळून फवारणी करावी.
  • मर रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 20 ई.सी. (3 मि.ली./ली.) +कार्बेन्डॅझीम 50 डब्ल्यु पी. (2 ग्रॅ./ली.) + कॉपर ऑक्सीक्लोराईड 50 डब्ल्यु पी. (3 ग्रॅ./ली.) या औषधांची 10 लिटर द्रावणाची भिजवण करुन प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या व निरोगी झाडाभोवती करावी.
  • मर रोगाच्या नियंत्रणासाठी चार किलो लाल माती/गेरु + क्लोरोपायरीफॉस 20 ई.सी. (50 मि.ली.) + कॉपर ऑक्सीक्लोराईड 50 डब्ल्यु पी. (25 ग्रॅ.) + 10 ली. पाणी यांच्या मिश्रणाची पेस्ट बनवून खोडाला जमिनीपासून 2 ते 3 फुट वर पर्यंत लावावी.
  • खोड पोखरणार्‍या अळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविणेसाठी प्रादुर्भाव दिसून आल्यास छिद्रातील भुसा सुईने बाहेर काढावा. प्रत्येक छिद्रात डी.डी.व्ही.पी. 2 ते 3 मि.ली. सोडून छिद्र लगेच चिखलाने बंद करावे.
  • सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी 5 किलो शेणखताबरोबर 20 ग्रॅ. फुले ट्रायकोडर्मा प्लस व (ट्रायकोडर्मा + पॅसीलोमायसीस) 3 किलो निंबोळी पेंड झाडाभोवती रींग पध्दतीने मातीत मिसळावी.
  • रस शोषणार्‍या कीडी व फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी अ‍ॅझाटिरक्टीन-20 मि.ली. किंवा गरजेनूसार सायनट्रीनीलप्रोल 9 मि.ली./10 ली. पाण्यात फवारणी करावी. अशाप्रकारे शेतकर्‍यांनी डाळिंब बागेसाठी या उपाययोजना कराव्यात.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी