देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. परंतु आर्थिक पार्श्वभूमी चांगली नसल्यामुळे एखादा लहान उद्योग / व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी त्यांना काही अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. या सर्व बाबींचा विचार केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरु केली.
कर्जाचे तीन गटात वर्गीकरण-
१. शिशु गट : रु.10,000 ते 50,000
२. किशोर गट : रु. 50,000 ते 5 लक्ष
३. तरुण गट : रु. 5 लक्ष ते 10 लक्ष
या योजनेंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादींमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे. यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इत्यादी लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतूद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे असतो.
यासाठी मुद्रा बँक योजना ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे माहिती होण्यासाठी आणि या योजनेचा लाभ गरजू आणि होतकरु व्यक्ती आणि बेरोजगार यांना व्हावा. या हेतूने राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर समिती नेमून या समितीमार्फत योजनेचा प्रचार, प्रसार आणि समन्वय करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
– कुणाशी संपर्क करावा:
आपल्या क्षेत्रातील बँकेशी किंवा जिल्हा उद्योग अधिकारी यांच्याशी..