नियोजन म्हणजे यशाची गुरुकिल्ली ! स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र .त्यावेऴी नरेंद्रची दुसऱ्या दिवशी परीक्षा असते. पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून वीणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो आणि म्हणतो, अरे नरेंद्रा, उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे. असे असूनही तू अभ्यास करण्याऐवजी इथे येऊन वीणा वाजवत बसलास. तू कसा पास होशील ? तेव्हा नरेंद्र म्हणाला , ” अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे . मी आज काय करतो याची नाही.” हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.सांगायचं तात्पर्य असं की कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहिजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही, त्यासाठी नियोजन हवेच.
-असे करा नियोजन
१. उद्या काय करायचे आहे याचे वेळापत्रक आजच बनवा आणि उद्या सकाळपासून उठल्या उठल्या या वेळापत्रकाप्रमाणे कामाला लागा.
२. दररोज आपला वेळ कुठे कुठे वाया जातो याची एक यादी बनवा. या यादीतील कोणकोणत्या बाबींवरील वेळ कमी करता येईल याचा विचार करा.
३. प्रत्येक काम दिलेल्या किंवा नियोजित वेळेवर करा. वेळेवर नाही झाले तर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि पुढील कामे होत नाही.
४. वेळेच्या व्यवस्थापनाची साधने वापरा. उदा. घड्याळ, कॅलेंडर, वेळापत्रक
५. कोणत्याची गोष्टींची वाट बघण्यात वेळ घालवू नका.
६. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा.
७. एका वेळेस एकच काम करा.
८. विनाकारण विचार करण्यात आणि ताणतणावात वेळ वाया जातो.
९. दिवसभरातील कामाचा आढावा घ्या. आपल्या वेळेचे नियोजन व्यवस्थित झाले कि नाही याचे विश्लेषण करा.