गेल्या 24 तासात 7,774 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात 89,56,784 मात्रा देण्यात आल्याने भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मात्रांचा 132 कोटी 93 लाखांचा (1,32,93,84,230) टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 1,38,52,959 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs 1st Dose 1,03,85,601
2nd Dose 95,98,690
 

FLWs

1st Dose 1,83,82,963
2nd Dose 1,66,89,050
 

Age Group 18-44 years

1st Dose 47,78,63,375
2nd Dose 26,94,08,769
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,94,30,622
2nd Dose 13,32,79,520
 

Over 60 years

1st Dose 11,84,52,114
2nd Dose 8,58,93,526
Total 1,32,93,84,230

गेल्या 24 तासांत 8,464 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,41,22,795 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.36% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या सलग 45 दिवसांपासून नव्या बाधितांची दैनंदिन संख्या 15,000 पेक्षा कमी राहण्याचा कल कायम राहिला आहे

गेल्या 24 तासात 7,774 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 92,281 आहे.  गेल्या 560 दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.27% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,89,459 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 65.58 (65,58,16,759) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.70% असून गेल्या  28 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.65% असून गेले 69 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 104 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.