पूर्वीपासून आपण ऐकत आलोय की, लहान मुलांना किमान २ फुटांवरून टीव्ही पाहून द्यावा नाहीतर त्यांचे डोळे खराब होतात. आजच्या फ्लॅट स्क्रीन, एलईडी, अल्ट्रा एचडीच्या काळातदेखील हा नियम लागू होईल का? आपल्यापैकी अनेकजण आणि त्यांची लहान मुले, टीव्हीच्या अगदी जवळ बसून टीव्ही बघतात, पण नशीब! त्यामुळे आपल्याला कोणत्याही शारीरिक व्याधी जडत नाहीत.
परंतु, हा गैरसमज का पसरला? तर सन १९६० मध्ये अमेरिकेमध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीने काही रंगीत टेलिव्हिजन संच बाजारात आणले. पण या टीव्ही संचांमधून मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या सरकारी आरोग्य विभागाने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करत साधारण १००००० पटीने जास्त किरणोत्सर्जन होई. जीईने तातडीने विकलेले सर्व टीव्ही परत मागवले आणि आपल्या उत्पादनात सुधारणा केली खरी! पण, तेव्हापासून आजतागायत टेलीव्हिजन संचांवर हा कायमचा दुर्दैवी कलंक लागला.
चुकीचा कोन नकोच..
मात्र चुकीच्या कोनात बसून किंवा जवळून बराच वेळ टीव्ही बघितला तर डोळ्यांवर ताण येऊ शकतो, डोळे थकू शकतात! पण यावर अगदीच सोपा उपाय म्हणजे, टीव्ही बंद करा आणि विश्रांती घ्या. रात्रीच्या निवांत झोपेमुळे डोळे पुन्हा ताजेतवाने होतील. ‘हाऊ स्टफ वर्क्स’ संकेतस्थळाच्या डेब्रा रोन्का म्हणतात, काही पालक मुलांमधील दृष्टीदोषाचा संबंध जवळून टीव्ही पाहण्याशी लावतात. जवळून टीव्ही पाहून मुलांमध्ये लघुदृष्टीदोष निर्माण होत नाही! तर, उलट ज्या मुलांमध्ये लघुदृष्टीता असते आणि त्याचे निदान झालेले नसते अशीच मुले जवळून टीव्ही पाहत असतात असा त्यांचा होरा आहे. त्या असंही नमूद करतात की, जर तुमची मुले नेहमीच टीव्हीच्या जवळ बसून टीव्ही बघत असतील तर त्यांचे डोळे वेळीच तपासून घ्या.
तासनतास टीव्ही पाहिला तर..
जी मुलं दिवसाला ४ तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यात घालवतात ती, अतिलठ्ठपणाची शिकार होऊ शकतात व त्यामुळे भविष्यात आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे तासनतास टीव्ही बघून टीव्हीत पाहिलेल्या वाईट गोष्टींचे अनुकरण करणे तसेच, जग भयानक आहे, त्यांच्या जीवाला काही अपाय होऊ शकतो अशी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. मुले टीव्हीवर बघितलेल्या धुम्रपान-मद्यपानासारख्या धोकादायक गोष्टींचे अनुकरण करू शकतात, त्याचप्रमाणे टीव्हीवरील पात्रांच्या प्रभावामुळे त्यांच्यात लिंगभेदाच्या, वंशभेदाच्या भावना अधिक मजबूत होऊ शकतात. जी मुले दररोज एक तास लहान मुलांसाठीच्या डीव्हीडीज अथवा व्हिडीओ पाहतात ती मुले कधीही ते व्हिडिओ न पाहणाऱ्या मुलांच्या तुलनेत सहा