गेल्या 24 तासांत देशात 8,439 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73,62,000  मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 129.54 कोटी मात्रांचा  (1,29,54,19,975)    टप्पा  पार केला  आहे. देशभरात 1,35,05,139 सत्रांच्या आयोजनातून हे लसीकरण करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे-

HCWs 1st Dose 1,03,84,977
2nd Dose 95,63,730
 

FLWs

1st Dose 1,83,81,800
2nd Dose 1,66,23,661
 

Age Group 18-44 years

1st Dose 47,10,59,550
2nd Dose 25,23,53,394
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,77,74,682
2nd Dose 12,84,68,102
 

Over 60 years

1st Dose 11,74,85,990
2nd Dose 8,33,24,089
Total 1,29,54,19,975

गेल्या 24 तासांत 9,525 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,40,89,137 झाली आहे.

परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर  98.36%  आहे, मार्च 2020 पासून सर्वोच्च दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग  41  दिवस   नव्या कोविड बाधितांची संख्या 15,000  हून कमी नोंदली जात  आहे.

 गेल्या 24 तासांत 8,439 नव्या कोविड बाधित  रुग्णांची नोंद झाली.

देशातील  कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 93,733 इतकी असून गेल्या 555 दिवसांमधील नीचांकी संख्या आहे .  देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या  0.27% आहे. मार्च 2020 पासून ही  सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,13,130 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 65 कोटी 6 लाखांहून अधिक (65,06,60,144)  चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.76%  असून गेले 24   दिवस हा दर 1% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज  0.70 % आहे.  दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 65  दिवस 2% हून कमी आहे आणि आता गेले सलग  100 दिवस हा दर 3 % हून कमी राहिला आहे.