बारावीनंतर करता येईल आयआयएममध्ये एमबीए

बारावीनंतर कोणते शिक्षण घ्यायचे या बद्दल अनेकांना प्रश्न असतो. आज अशाच एका अभ्यासक्रमांबद्दल जाऊन घेऊ यात. सन २०१९च्या शैक्षणिक वर्षापासून रोहतक स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे.

पदवी ते पदव्युत्तर पदवी-

पदवी ते पदव्युत्तर पदवी असे हा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संस्थेमार्फत एमबीए ही पदवी प्रदान केली जाते. एखाद्या विद्यार्थ्यास तीन वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडवासा वाटल्यास, बीबीए-बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान केली जाते. पाच वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम १५ सत्रांमध्ये शिकवला जातो. प्रत्येक वर्षी तीन सत्रे घेण्यात येतात.

अभ्यासक्रम दोन भागात विभाजित करण्यात आला आहे. पहिल्या भागात पायाभूत विषयांमध्ये लक्ष केंद्रित केले जाते. दुसऱ्या भागात व्यवस्थापन विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करावी लागते. १६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

रोहतक आयआयएमचीची स्थापना २००९ साली करण्यात आली. या संस्थेला भारत सरकारने इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पार्टन्सचा दर्जा दिला आहे.

प्रवेश प्रक्रिया
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते. या परीक्षेत, विद्यार्थ्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांचा कल तपासणाऱ्या प्रश्नांचा समावेश असतो. या चाळणी परीक्षेत विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण निवडक विद्यार्थ्यांना, लेखन कौशल्य चाळणी (रिटन ॲबिलिटी टेस्ट) आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते.

अभ्यासक्रमाची रचना –
हा अभ्यासक्रम गणित, अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित, मानव्यशास्त्र या चार घटकांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. कम्युनिकेशन मॅनेजमेंट- व्यवसाय संवाद संप्रेषण, इन्फर्मेशन सिस्टिम – माहिती कार्यप्रणाली आणि परदेशी भाषा यांचा अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. चौथ्या आणि पाचव्या वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी जे विषय शिकवले जातात तेच विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात.

काय शिकाल?
पहिल्या तीन वर्षी पुढील विषयांचा अभ्यास करावा लागतो. (१) इकॉनॉमिक्स (२) फायनांस (३) अकाउंटिंग (४) लॉ, (५) स्टॅटिस्टिक्स, (६) मॅथेमॅटिक्स (७) फिलॉसॉफी (८) सायकॉलॉजी (९) बिझिनेस कम्युनिकेशन (१०) पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन (११) सोशिऑलॉजी (१२) सस्टेनिबिलिटी (१३) प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट (१४) मीडिया ॲण्ड जर्न्यालिझम (१५) ॲडव्हर्टायजिंग (१५) बिझिनेस हिस्ट्री (१६) इंन्फर्मेशन टेक्नॉलॉजी.

चौथ्या आणि पाचव्या वर्षात पुढील विषय शिकावे लागतात- (१) जनरल मॅनेजमेंट (२) बिझिनेस कम्युनिकेशन (३) मार्केटिंग मॅनेजमेंट (४) स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (५)मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टिम (६) ऑपरेशन मॅनेजमेंट आणि क्वाँटिटेटिव्ह टेक्निक (७) ह्युमन रिर्सोस मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर (८) इकॉनॉमिक्स आणि पब्लिक पॉलिसी (९) फायनांस आणि अकाउंटिंग.
इतर विषय – (१) पब्लिक स्पिकिंग (२) क्रिएटिव्ह रायटिंग (३) रुरल आणि सोशल इर्मशन प्रोजेक्ट (४) बिझिनेस इंटर्नशीप

अर्हता- हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास करता येतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी गुणांची मर्यादा 55 टक्के.

संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक मॅनेजमेंट सिटी, सदर्न बायपास, एनएच – 10, सुनारिआ रोहतक -124010, दूरध्वनी- 01262 – 228505,फॅक्स-274051,ईमेल- ipmoffice@iimrohtak.ac.in
संकेतस्थळ- www.iimrohtak.ac.in.