कतरिना आणि विकी कौशलचे लग्न, पण ऐन लग्नाच्या तोंडावर झाले असे…

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही ९ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याचवेळी लग्नाच्या काही दिवस आधी राजस्थानच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात या जोडप्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्याविरोधात सोमवारी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खरं तर, हे सेलिब्रिटी कपल 2 दिवसांनी राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत आहे. लग्नासाठी दोघांनी सवाई माधोपूर येथील चौथ का बरवारा येथे हॉटेल बुक केले आहे. प्रसिद्ध चौथ माता मंदिर देखील येथे आहे. मात्र कतरिना आणि विकीच्या लग्नामुळे या ठिकाणचा रस्ता बंद झाला आहे. अशा स्थितीत मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद केल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सवाई माधोपूर येथील रहिवासी नेत्रा बिंदू सिंग जदौन यांनी ही तक्रार न्यायालयात दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीत कतरिना कैफ विकी कौशलसह सवाई माधोपूरचे जिल्हाधिकारी आणि हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट बरवारा व्यवस्थापन यांनाही आरोपी करण्यात आले आहे. तक्रार नोंदविताना मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद असल्याने अडचण होत असल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे.

दाखल तक्रारीनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नामुळे प्रसिद्ध चौथ माता मंदिराचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता ६ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गाने दररोज अनेक भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतात. अशा स्थितीत रस्ता बंद केल्याने 7 दिवस भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

जनहितार्थ चौथ माता मंदिरापर्यंतचा रस्ता पुन्हा सुरू करण्याची मागणी अधिवक्ता नेत्रा बिंदू सिंह जदौन यांनी तक्रारीद्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. आता मातेचे दर्शन होणार की बारा डिसेंबरपर्यंत रस्ता बंद राहणार की अन्य काही पर्यायी मार्ग असू शकतो, याचा निर्णय न्यायालय घेणार आहे.

दरम्यान येथे कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधींना आज मेहंदीने सुरुवात होणार आहे. उद्या महिला संगीत आणि त्यानंतर 9 डिसेंबरला दोघेही लग्नाचे सात फेरे घेणार आहेत.