बीएसएनएल देशात आणणार फोरजी सेवा

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने त्यांचे प्री-पेड प्लॅन 25 टक्क्यांपर्यंत महाग केले आहेत. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या या निर्णयानंतर ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण असून ते सोशल मीडियावर भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) पाठिंबा देत आहेत. दरम्यान, बीएसएनएलने एक मोठी घोषणा केली असून, त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. BSNL ने म्हटले आहे की ते सप्टेंबर 2022 पर्यंत देशभरात 4G लाँच करेल. या गोष्टी बीएसएनएलने संसदेत सांगितल्या आहेत. BSNL ला त्यांच्या 4G सेवेतून 900 कोटी रुपयांपर्यंत नफा अपेक्षित आहे.

BSNL 4G सेवा खाजगी कंपन्यांसाठी आव्हान असेल. दरम्यान बीएसएनएलच्या 4जी बद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना, दूरसंचार राज्यमंत्री म्हणाले की बीएसएनएलने त्यांच्या 4जी सेवांसाठी सप्टेंबर 2022 ही अंतिम मुदत दिली आहे. ते पुढे म्हणाले की, देशभरात 4G सेवा सुरू होण्यापूर्वी पहिल्या वर्षात सुमारे 900 कोटी रुपयांचा महसूल जमा होईल.

काही दिवसांपूर्वी, BSNL ला 4G अपग्रेडेशनसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) कडून परवानगी मिळाली होती, परंतु 4G साठी नोकियाचे भाग सरकारने असुरक्षित म्हटले होते आणि ते नाकारले होते. BSNL ने पूर्णपणे मेड इन इंडिया पार्ट्स वापरावेत अशी सरकारची इच्छा आहे.
खासगी कंपन्यांबाबत ग्राहकांची नाराजी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, मात्र बीएसएनएलच्या समर्थनार्थ लोक खरेच पुढे येतील का, हे बीएसएनएलची फोरजी सेवा देशभरात सुरू झाल्यानंतरच कळेल.