गेल्या 24 तासात 8,954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या 99,023, 547 दिवसांनंतर एक लाखापेक्षा कमी

गेल्या 24 तासात  80,98,716 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने

भारताने 124.10 (1,24,10,86,850)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 1,28,94,826 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose 1,03,83,861
2nd Dose 94,97,716
 

FLWs

1st Dose 1,83,79,105
2nd Dose 1,65,00,848
 

Age Group 18-44 years

1st Dose 45,94,92,943
2nd Dose 22,56,54,139
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,49,49,869
2nd Dose 12,10,09,097
 

Over 60 years

1st Dose 11,58,23,193
2nd Dose 7,93,96,079
Total 1,24,10,86,850

गेल्या 24 तासांत 10,207 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,40,28,506

झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.36% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 157 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 8,954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 547 दिवसांनंतर एक लाखापेक्षा कमी असून सध्या ती  99,023 आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.29% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

 गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,08,467  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 64.24  (64,24,12,315) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.84% असून गेल्या 17 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.81% असून गेले 58 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 93 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.