नाशिकमध्ये मुस्लिम भगिनींकडून करोना योद्ध्यांना राखी

रक्षाबंधनचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. दरम्यान जुने नाशिकमधून या सणानिमित्ताने अनोख्या पद्धतीने एकात्मतेचे दर्शन घडले.

नगरसेविका समीना मेमन यांच्या पुढाकाराने मागील काही वर्षापासून रक्षाबंधनाचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे. यंदाही ही मुस्लिम भगिनींनी करोना योद्ध्यांना राखी बांधून त्यांच्या कार्याचा गौरव करत सण साजरा केला.

आज सकाळी मुस्लिम भगिनींनी रक्षाबंधन निमित्ताने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह पोलीस बांधवांना तसेच शिंगाडा तलाव येथील महापालिकेच्या अग्निशामक दलातील जवानांना व महापालिका करोना प्रमुख डॉ. आवेश पलोड आदींना राखी बांधून एक अनोखा संदेश देण्यात आला.

यावेळी कनीज फातिमा, आफ्रीन शेख आदी भगिनी उपस्थित होत्या. करोनामुळे एक मोठी राखी तयार करून तीच प्रदान करण्यात आली.