महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या मुंबई येथील शासकीय तंत्रनिकेतनात विविध लघु कालावधीचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यांची माहिती जाणून घेऊ.
ऑटोकॅड सॉफ्टवेअर विथ ड्राफ्टिंग
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा एसएससी/एचएससी/पदविका/अभियांत्रिकी पदवीधर/आयटीआय/ड्राफ्टसमन/एमसीव्हीसी विद्यार्थी असला पाहिजे. या अभ्यासक्रमाचा कालावधी 8 आठवडे असून शुल्क 5,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9833091185/ 8898334241/ 9920042650 असा आहे.
3 डी मॉडलिंग युजिंग प्रो-ई
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा पदविकाधारक/अभियांत्रिकी पदवीधर/आयटीआय (मेकॅनिकल) ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 8 आठवडे असून शुल्क 7,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक –8898334241/9833091185 असा आहे.
सीएनसी प्रोग्रॅमिंग ॲण्ड ऑपरेशन (लेथ ॲण्ड मिल एम/सी)
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा पदविकाधारक/ अभियांत्रिकी पदवीधर/आयटीआय (मेकॅनिकल) किंवा या क्षेत्रातील 6 महिने अनुभव ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवडे असून शुल्क 7,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9819010418/9881056202 असा आहे.
कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्किंग
याअभ्यासक्रमासाठी उमेदवार हा एसएससी पास असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवडे असून शुल्क 3,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9702614695/9321048825 असा आहे.
इंडस्ट्रियल ऑटोमेशन
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा पदविकाधारक/ अभियांत्रिकी पदवीधर/ आयटीआय/ एनसीटीव्हीटी किंवा या क्षेत्रातील 2 वर्षे अनुभव ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 9 आठवडे असून शुल्क 14,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9819823408/ 8652017000/ 9869375141 असा आहे.
इन्टिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा पदविकाधारक/ अभियांत्रिकी पदवीधर/आयटीआय/एनसीटीव्हीटी किंवा या क्षेत्रातील 2 वर्ष अनुभव ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवडे असून शुल्क 15,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9820754727/8422906324/9970380438 असा आहे.
साऊंड इंजिनिअरिंग (लाईव्ह/डी.जे/पोस्ट प्रॉडक्शन)
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा एसएससी पास ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 12 आठवडे असून शुल्क 30,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक –8390118685/9323396358 असा आहे.
फिल्म ॲण्ड व्हिडीओ एडिटिंग
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा एसएससी पास ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 12 आठवडे असून शुल्क 30,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक –8390118685/9323396358 असा आहे.
एनडीटी – नॉन डिस्ट्रक्टटिव्ह टेस्टिंग (लेव्हल II)
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा पदविकाधारक आणि पदवीधर (मेकॅनिकल, प्रॉडक्शन, सिव्हिल ॲण्ड केमिकल)/आयटीआय विथ एनसीव्हीटी ही पात्रता धारण करणारा असावा. अभ्यासक्रमाचा कालावधी 10 आठवडे असून शुल्क 13,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9004455666/9867271555 असा आहे.
प्रोजेक्ट ॲण्ड पायपिंग डिझाइन इंजिनियरींग लेव्हल I
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा बी.ई. (मेकॅनिकल/ केमिकल), बीएस्सी (फिलिक्स/केमिकल), एचएससी पास (सायन्स) आणि एनसीव्हीटीसह आयटीआय ही पात्रता धारण करणारा असावा. अभ्यासक्रमाचा कालावधी 8 आठवडे असून शुल्क 28,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9004455666/9004982333 असा आहे.
प्रोजेक्ट ॲण्ड पायपिंग डिझाइन इंजिनियरींग लेव्हल II
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा बी.ई. (मेकॅनिकल/ केमिकल) व अनुभव ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 12 आठवडे असून शुल्क 38,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9004455666/9004982333 असा आहे.
डिप्लोमा इन फायर ॲण्ड इंडस्ट्रियल सेफ्टी
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा बी.एस्सी (फिजिक्स/केमिस्ट्री), एसएससी पास (सायन्स), एनसीव्हीटी सह आयटीआय ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिने असून शुल्क 17,300/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9004455666/9004982333 असा आहे.
ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर ॲण्ड इंडस्ट्रियल सेफ्टी
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा बी.ई. पदविकाधारक (मेकॅनिकल/केमिस्ट्री), बी.एससी.(फिजिक्स/केमिस्ट्री), बारावी (विज्ञान) उत्तिर्ण एनसीव्हीटी सह आयटीआय ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 1 वर्ष असून शुल्क 32,600/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9004455666/9004982333 असा आहे.
एचव्हीएसी – हिट वेन्टीलेशन आणि एअर कन्डिशनिंग टेक्नीशियन
या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा बी.ई. पदविकाधारक (मेकॅनिकल/केमिस्ट्री), बी.एस्सी. (फिजिक्स/केमिस्ट्री), बारावी (विज्ञान) उत्तिर्ण व या क्षेत्रातील अनुभव एनसीव्हीटीसह आयटीआय ही पात्रता धारण करणारा असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी 8 आठवडे असून शुल्क 27,100/- रुपये इतके आहे. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक – 9004455666/9004982333 असा आहे.
शुल्क फक्त प्रिंसिपल गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक, मुंबई यांच्या नावे काढलेल्या धनाकर्षाद्वारे (डी.डी.) स्वीकारले जाईल. उपरोक्त शुल्क हे कोरोना पूर्व काळातील आहे, त्यात वाढ होऊ शकते. शुल्काशिवाय 15 टक्के सेवा कर आकारण्यात येईल. चौकशीसाठी सकाळी 9 ते सायं. 6 या वेळेतच दूरध्वनीवर संपर्क साधावा.
संपर्क पत्ता – गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक मुंबई, 49 खेरवाडी, अली यावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
वेबसाईट : www.gpmumbai.ac.in.