प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम वर जोनास हे तिचे आधीचे नाव बदलून ‘प्रियांका चोप्रा’ असे ठेवले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांना उत आला आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे की काय, असा अंदाजही चाहते लावत आहेत. काहीनी तर दोघेही कदाचित घटस्फोट घेणार आहेत, असेही म्हटले आहे.
प्रियांका चोप्राच्या इंस्टाग्राम बायोमध्ये आता प्रियांका चोप्रा जोनासच्या जागी तिचे आधीचे नाव आहे. मात्र पती निक जोनासचे आडनाव काढून टाकल्यानंतर अशा अफवा पसरल्या आहेत. दरम्यान प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी म्हटलेय कि “हे सर्व मूर्खपणा आहे, अफवा पसरवू नका.”
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची जोडी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहे. दोघांची रोमँटिक शैली दररोज चाहत्यांची मने जिंकते. मात्र, हे दाम्पत्य सध्या इतर कारणांमुळे चर्चेत आहे आणि ते म्हणजे दोघांमधील घटस्फोटाच्या बातम्यांच्या अफवा. आता या तिचा पती निक जोनासचा एक जिम व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावर प्रियांका चोप्रानेही प्रतिक्रिया दिली आहे.
निक जोनासने इन्स्टाग्रामवर त्याचा फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जिममध्ये बायसेप्सचा व्यायाम करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर टिप्पणी करताना प्रियंका चोप्राने लिहिले: “डॅम! मी तुझ्या या हातांवर मरते.” प्रियांकाने केलेल्या या कमेंटवरून दोघांमध्ये खूप प्रेम असल्याचे दिसून येते आणि घटस्फोटाच्या बातम्या केवळ अफवा दिसत आहेत.