एयरटेल आणि व्होडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका

मोबाईल सेवा कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेडच्या प्लानच्या किमती मोठ्या फरकाने वाढवल्या आहेत. वाढत्या महागाईत त्यामुळे ग्राहकांवर बोजा पडणार आहे. एअरटेलने जाहीर केलेले नवीन दर २६ नोव्हेंबर २०२१ पासून लागू होतील. लवकरच Vi आणि Jio देखील टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकतात. त्यांची शेवटची दरवाढ डिसेंबर 2019 मध्ये झाली होती. सोमवारी सकाळी आपल्या 350 दशलक्ष पेक्षा जास्त ग्राहकांना धक्का देत, एअरटेलने सांगितले की ते त्यांच्या प्रीपेड योजनांवर 20-25 टक्क्यांनी दर वाढवणार आहे. हे नवे दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. जुलै 2021 मध्ये कंपनीने पोस्टपेड प्लॅनमध्येही वाढ केली होती. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये प्रीपेडमध्ये वाढ करण्यात आली होती.

नुकतीच एअरटेलने प्रीपेड प्लानची किंमत वाढवल्यानंतर आता आयडिया वोडाफोनने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. येत्या 25 नोव्हेंबरपासून नवीन योजना लागू होणार आहेत. त्यामुळे वीचे कमीत कमी प्रीपेड रिचार्ज ९९ रुपयांपासून सुरु होईल. पूर्वी हाच प्लान ७९ रुपयांचा होता. १४९ रुपयांच्या रिचार्जची किंमत आता १७९ रुपये होणार आहे. याशिवाय इन्टरनेटचा आकारही वाढला आहे.

नवीन टॅरिफ योजनेच फायदा “भारतातील सर्वात वेगवान मोबाइल नेटवर्क सुधारण्यासाठी” होईल, असे VI ने सांगितले. “VI सरकारच्या डिजिटल इंडिया व्हिजनला गती देण्यासाठी आपली भूमिका बजावण्यासाठी वचनबद्ध आहे. आपल्या ग्राहकांना सोपी आणि सोयीस्कर उत्पादने प्रदान करण्याच्या वचनबद्धतेनुसार, VI ने व्हॉईस आणि डेटा या दोन्हींसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनांची श्रेणी तयार केली आहे, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

दरम्यान 25 नोव्हेंबरपासून नवीन योजना लागू होणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजी एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी 20-25 टक्के दरवाढीची घोषणा केल्यानंतर हे झाले आहे. सोमवारी सकाळी आपल्या 350 दशलक्ष पेक्षा जास्त ग्राहकांना धक्का देत, एअरटेलने सांगितले की ते त्यांच्या प्रीपेड योजनांवर 20-25 टक्क्यांनी दर वाढवणार आहे. हे नवे दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. ही बातमी आल्यापासून व्होडाफोन आणि एअरटेल या दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे.