लाल सिंग चढ्ढा’ या तारखेला प्रदर्शित होणार

अमीर खानच्या चाहत्यांना दंगलनंतर आता आमीरखानच्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. आमीर खानच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाची चर्चा होत होती आणि तो प्रदर्शित कधी होणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली होती.

आता ही प्रतीक्षा संपणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर आता रिलिज झाले आहे. या चित्रपटात अमीर खानसोबत करीना कपूरही काम करत आहे. खरं तर हा चित्रपट या वर्षीच्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. तसे आधी घोषितही केले होते. मात्र खेळाच्या संदर्भात येऊ घातलेल्या 83 या चित्रपटामुळे हे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 83 हा चित्रपट कपिल देव यांच्या जीवनावर आधारित आहे. त्याचीही बरीच चर्चा असल्याने बॉक्स आॅफीसवर एकाच दिवशी दोन बडे चित्रपट प्रसिदद्ध झाल्यास त्याचा फटका बसू शकेल, म्हणून लाल सिंग चढ्ढाचे प्रदर्शन आता लांबवले आहेत.

नव्या पोस्टरला करीना कपूरने आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. पंजाबमधील सरसोंच्या फुलांचे शेत, त्याच्या कडेला एक घर अािण वरती अमिर खान आणि करीना यांचे फोटो असा आशय त्यावर आहे. या पोस्टरवर चित्रपटाची नवी तारीख आता बैसाखी ठरविण्यात आली आहे. बैसाखीचा सण पंजाबसह उत्तरेकडे महत्त्वाचा मानला जातो. वसंत ऋतुशी संबंधित हा सण आहे. म्हणूनच 14 एप्रिल रोजी आता चित्रपट प्रदर्शित होईल. थोडक्यात चित्रपट दर्शकांना आता पुढील वर्षीच्या म्हणजे 2022च्या 14 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल.