व्यायामासाठी योग्य काळजी घ्या

व्यायामासाठी योग्य काळजी घेतली तर शरीराला नक्कीच फायदा होईल. आजारी असताना व्यायाम करू नका. जे व्यायाम सुरु करणार आहेत किंवा जे व्यायामाने परिपक्व आहेत त्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचे आहे .आजारी असाल , तुम्हाला ताप आला असेल तर या विभिन्न परिस्थितीला समजण्याची योग्यता तुमच्याकडे असावी आणि अशा वेळी तुम्ही जिममध्ये जायला नको.

जिम मध्ये गेल्यावर तुम्हाला सगळे मशीन वापरण्याची गरज नाही. जर तुमचा ट्रेनर तुम्हाला असे सांगत असेल तर त्या मागे काही तरी विचार आहे . तुमच्या ट्रेनरने काही विशिष्ट पद्धतीचे व्यायाम तुम्हाला शिकवायला हवे . जसे फ्री वेट, स्ट्रेच आणि पाईलेटदेखील उपयोगी ठरू शकते .
तुम्हाला सगळ्या मशीनद्वारे होणाऱ्या व्यायामाची गरज नसते . कॅलरी जाळणे आणि दुखणे यामध्ये अंतर आहे . परत एकदा यावरून तुमच्या सामान्य ज्ञानाची चाचणी होते . कारण हे तुमच शरीर आहे आणि तुम्हीच तुमच्या शरीराला सर्वोत्तम पद्धतीने ओळखता आणि हे योग्य प्रशिक्षक जाणतो . ही तुमची जबाबदारी आहे की शरीरात कुठेही दुखणे जसे फुफ्फुसात दुखणे सुरु झाले तर हे गंभीर आहे.

हे अत्यंत साधे आणि शरीरास उपयुक्त बनवणारे व्यायाम प्रकार आहेत .चेस्ट अप आणि चिन अप . हा व्यायाम बरेच लोक चुकीच्या पद्धतीने करतात . चिन अपला वास्तविकतारित्या चेस्ट अप म्हणतात कारण याचा छातीतून उठणाऱ्या अनियत्रतेला कमी करतो .
ज्यामुळे शारीरिक मजबुती प्राप्त होते .पुश अप योग्य पद्धतीने करा. पुश अप बाबतीतही एक चूक होऊ शकते . पुश अप तेव्हाच चांगले होऊ शकतात जेव्हा जमिनीवर हॅन्डल ठेवून किंवा डम्बल सेटच्या साहाय्याने केले जातात. तुमचे हात फरशीवर ठेवण्यापेक्षा हे जास्त योग्य . जमिनीवर हात ठेवल्याने तळव्यांवर ताण येऊ शकतो . पण डम्बल सेटचा वापर केल्यास तळहातावर फार जोर पडणार नाही .मनगटावर जोर आल्याने जास्त पुश अप्स काढणे शक्य होते.

तुमचा पोशाख महत्त्वपूर्ण आहे. काही गोष्टींच्या खरेदीसाठी हे उपयुक्त असू शकत पण व्यायामाने सर्वोत्कृष्ट परिणाम होईल अशी अपेक्षा करू नका. एखादा जुना शर्ट जो तुम्ही झोपेच्या वेळी वापरता आणि दहा वर्षांपूर्वी वापरत असलेले शूज उपयोगात आणत असाल तर ते योग्य दिसणार नाही. जिमसाठी योग्य तो सूट वापरा. व्यायामामध्ये थोडे अंतर ठेवा. अभ्यासावरून असे सिद्ध झाले की छोटे परंतु तीव्र ऊर्जा देणारे व्यायाम तुम्हाला जास्त वेळ निरोगी ठेवण्यास मदत करतात.