पायाभूत सुविधांमध्ये करिअरच्या संधी

अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे महत्वाचे काम हे क्षेत्र करित आहे. या क्षेत्रातील अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील पाच वर्षात भारतात साधारणत: 500 मिलियन डॉलर्स याक्षेत्रावर खर्च केला जाऊ शकतो. यातील 70 टक्के खर्च उर्जा, रस्ते आणि नागरी पायाभूत सुविधा, पुल, रेल्वे, विमानतळे, पाणी पुरवठा, जलसिंचन, धरण, बंदरे आदी बाबींवर अपेक्षित आहे. 2022 पर्यंत 19 हजार किलोमीटर द्रुतगती मार्ग बांधले जाऊ शकतात.

कृषीक्षेत्रानंतर बांधकाम हे रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या संधी निर्माण करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राची वार्षिक चक्रवाढ 11.1 टक्के अशी आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती लक्षणीय हातभार लावत आहेत. या क्षेत्रात खाजगी आणि शासकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. शासनाची धोरणे या क्षेत्रास अधिकाधिक साहाय्यभूत ठरणारी आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात.

पायाभूत सुविधा अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था

१. आरआयसीएस-स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हिरॉन्मेन्ट

ॲमिटी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कार्यरत आरआयसीएस- स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हिरॉन्मेन्ट या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन (1) कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट, अर्हता- 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील 12 वी परीक्षा उत्तीर्ण. निवड प्रक्रिया- 12 वीमध्ये मिळालेले गुण, इंग्रजी भाषा चाळणी परीक्षा आणि मुलाखत, (2) रिअल इस्टेट ॲण्ड अर्बन डेव्हलपमेंट / अर्हता- 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील 12 वी परीक्षा उत्तीर्ण. निवड प्रक्रिया- 12 वीमध्ये मिळालेले गुण, इंग्रजी भाषा चाळणी परीक्षा आणि मुलाखत (12 वीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जातो.)

संपर्क- (1) आरआयसीएस ( रॉयल इंस्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स),स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हिरॉन्मेन्ट, ब्लॉक- एफ-2, फिफ्थ फ्लोअर, ॲमिटी युनिव्हर्सिटी-सेक्टर-125 , नॉयडा-201313, दूरध्वनी- 0120-6673000 (2)
आरआयसीएस स्कूल ऑफ बिल्ट, ३०३, थर्ड फ्लोअर, ॲमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, भातान, पोस्ट सोमठाणे, पनवेल-410206,संपर्क-भ्रमणध्वनी-७०४५७८०१२६, ईमेल- ricssbe@rics.org किंवा admissions@mum.amity.edu
संकेतस्थळ- www.ricssbe.org आणि amity.edu/mumbai

२. युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज-

अभ्यासक्रम- बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. कालावधी- चार वर्षे.अर्हता-50 टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह 12 वी उत्तीर्ण. संपर्क -पोस्ट ऑफिस बिधोली, व्हाया प्रेमनगर ,देहरादून-248007, दूरध्वनी-0135-2770137, ईमेल-enrollments@upes.ac.in
संकेतस्थळ- upes.ac.in,

३. सिम्बॉयसीस स्किल्स ॲण्ड ओपन युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम – बी.टेक इन कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. कालावधी – चार वर्षे. अर्हता- 12वी विज्ञान शाखेत गणित, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान किंवा रसायनशास्त्र यापैकी कोणताही एक विषय घेऊन सरासरीने 45 टक्के गुण मिळायला हवेत. निवड- जेइइ (मेन) किंवा एम.एच-सीइटीचे गुण निवडीसाठी ग्राह्य धरले जातात.

संपर्क- किवाळे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग,पुणे- 412101,दूरध्वनी- 020-27187768, ईमेल- admissions@ssou.ac.in, संकेतस्थळ- http://www.ssou.ac.in

४. हिंदुस्थान इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्स-
अभ्यासक्रम – (1) बी.टेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट (2) बी.टेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. संपर्क- 40,जीएसटी रोड,सेंट थॉमस माऊंट चेन्नई- 600016, दूरध्वनी- 044-22342155, ईमेल- info@ hindustanuniv.ac.in
,संकेतस्थळ-www.hindustanuniv.ac.in

५. आयआयटी मद्रास-
अभ्यासक्रम- (1) बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ एम.टेक स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चरल इंजिनिअरिंग (2) बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ एम.टेक स्पेशलायझेशन इन बिल्डिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट, संपर्क- आयआयटी,चेन्नई-600036, संकेतस्थळ- www.iitm.ac.in

६. श्री गुरु गोविंद सिघ ट्रायसेनटेनरी युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. कालावधी-चार वर्षे. अर्हता- 12वी विज्ञानशाखेची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण.
संपर्क- चंदू-बुधेरा, गुरुग्राम-बदली रोड, गुरुग्राम-122505, दूरध्वनी-0124-2278183, ईमेल-info@sgtuniversity.org ,संकेतस्थळ-sgtuniversity.ac.in