एकीकडे जगभरात क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल करन्सीची भुरळ लोकांना पडली असून या एका आकडेवारीनुसार जगभरातील गुंतवणुकदारांनी आशेपोटी त्यात आपले साडेसातशे अब्ज रुपये गमावले आहेत. त्यामुळे आभासी चलनावर निर्बंध आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असतानाच ही एक वेगळी बातमी. आता भारतीय रिझर्व बॅँक स्वत:च एक डिजिटल चलन आणण्याच्या विचारात आहे. पुढील आर्थिक तिमाहीत रिझर्व बॅँक हा प्रकल्प सुरू करू शकते. हा एक पथदर्शी किंवा पायलेट प्रोजेक्ट असणार आहे. तो बराचसा आभासी किंवा क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच असेल.
एका आर्थिक परिषदेत रिझर्व बॅँकेचे महाप्रबंधक पी. वासुदेवन यांनी या बद्दलची माहिती सांगितली आहे. ते म्हणाले की काही लोकांमध्ये चर्चा होती डिजिटल करन्सीबाबत पुढच्या आर्थिक वर्षात निर्णय होऊ शकतो. मात्र आम्ही येत्या आर्थिक तिमाहीत आभासी चलनचा हा पथदर्शी प्रकल्प सुरू करत आहोत.
भारताच्या मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या, या डिजिटल चलने, किंवा सीबीसीडी, मुळात भारतासाठी फिएट चलनांची डिजिटल आवृत्ती आहेत. भारतासाठी, हे देशांतर्गत चलन फक्त मुद्रा म्हणून वापरले जाईल. तत्पूर्वी, एका निवेदनात, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले होते की, सीबीडीसीचे सॉफ्ट लॉन्च डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे, परंतु आरबीआयने अद्याप लॉन्च करण्यासाठी कोणतीही अधिकृत अंतिम मुदत दिलेली नाही.