प्रदूषण, धूळ आणि माती यामुळे चेहरा खराब होतो आणि हल्ली अनेक ठिकाणी मुली सौंदर्याबद्दल खास उपचार घेतात. पण त्या आधी घरगुती उपचार करून बघावेत. ज्याचा साईड इफेक्ट होत नाही.
सगळ्यात मोठी समस्या असते ती पिंपल्स. ज्यामुळे चेहरा निस्तेज होतो. आता या सगळ्यांवर घरगुती उपचार करून बघा.
पिंपल्स आहेत ?
ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स असतील तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावावी आणि १५–२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा.
ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना पण प्रकारची चमक येते.
डोळ्याखाली काळी वर्तुळे ?
डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावावी. काळी वर्तुळे नाहीशी होतात.
खूप तणाव असेल तरीही डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात. अशा वेळी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावेत. डोळ्यांना थंडावा मिळतो.
निस्तेज चेहरा ?
चेहरा निस्तेज झाल्यास चंदन पावडर, एक चमचा मंजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, अर्धा चमचा आंबेहळद हे सर्व दुधात एकत्र करुन चेहऱ्यावर लावावे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. असे केल्यास चेहऱ्यावर चमक येते.
कोरफडच्या गराने चेहऱ्यावर मसाज करावा. चेहऱ्यावर चमक तर येतेच पण रंगही उजळतो.