अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा. दोघेही विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. सोमवारी चंडीगडमध्ये त्यांनी समारंभपूर्वक लग्न केले. या दोघांनीही लग्नाचे फोटो आपल्या सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. दोनच दिवसांपूर्वी गुडघ्यावर बसून राजकुमार रावने भावी पत्नी पत्रलेखाला अंगठी घालण्याचा व्हिडिओ चर्चेत आला होता.
अभिनेता राजकुमार रावने आपल्या सोशल माध्यमातून या लग्नाचे फोटो प्रसिध्द करून त्याची अधिकृत घोेषणा केली आहे. त्याने भावूक होऊन म्हटलेय की अखेर अकरा वर्षांच्या प्रेम आणि रोमान्स, मैत्री आणि मजेनंतर मी माझी सर्वस्व असलेल्या पत्रलेखाशी आज विवाहबद्ध झालोय. ती माझी आत्मज आहे, माझी सर्वोत्तम मित्र आहे आणि माझं कुटुंबही आहे. आज पत्रलेखाचा पती म्हणवून घेण्याइतका दुसरा आनंद माझ्या आयुष्यात नाही. असं हे नातं प्रेमाच्या पलिकडलं आणि आयुष्यभराचं असणार आहे.
दुसरीकडे अभिनेत्री पत्रलेखानेही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ती म्हणते की मी माझ्या सर्वस्वाशी आज लग्न केलंय. तो माझा बॉयफ्रेंड, माझं कुटुंब, पार्टनर इन क्राईम , माझा आत्मज आणि माझा 11वर्षांपासूनचा घनिष्ठ मित्र आहे. तुझी पत्नी होण्यासारखी आज दुसरी कुठलीही मोठी भावना मनात येत नाहीये, आपलं हे नातं जन्मोजन्मीचं !
अभिनेता राजकुमार राव याने 2010 मध्ये लव्ह सेक्स और धोका या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. यानंतर 2013 मध्ये काय पो चे! सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार यासह त्याला शाहिद या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. न्यूटनसारखे अनेक गाजलेले चित्रपट त्याने दिले आहेत. त्याची नववधू पत्रलेखा ही अभिनेत्री असून सिटीलाईट, लव गेम्स, नानू की जानू या सारख्या चित्रपटासाठी ती ओळखली जाते. 31 वर्षीय पत्रलेखाचे नाव अनिता पॉल असेही आहे.