मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

गोंदिया, जळगाव, धुळे, नंदुरबार, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा इत्यादि भागात दी १२ ते १९ नोव्हेम्बर दरम्यान पाऊस शक्यता वाटत नाहीत, बहुदा कोरडे व काही वेळा ढगाळ वातावरण राहू शकते. एखाद ठिकाणी अल्प – हलका पाऊस होऊ शकतो.

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, बीड, औरंगाबाद, नाशिक, नगर, पुणे, पालघर, ठाणे, मुंबई इत्यादी भागात दी १२ ते १८ नोव्हेंबर दरम्यान वातावरण काही ठिकाणी काही वेळा ढगाळ व काही वेळा निरभ्र /कोरडे राहण्याच्या, पाऊस तीव्रता / शक्यतेचे प्रमाण बरेच कमी, तुरळक ठिकाणी बहुदा अल्प – हलक्या पावसाच्या शक्यता. येखाद दोन ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो.

लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी इत्यादी भागात दी १३ ते १९ नोव्हेम्बर दरम्यान वातावरण ढगाळ व काही वेळा निरभ्र/ कोरडे राहण्याच्या, पाऊस तीव्रता /शक्यतेचे प्रमाण थोडे अधिक, बहुदा हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता. एखाद दोन ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.

२० ते २६ नोव्हेंबर दरम्यान पुन्हा ढगाळ व पावसाचे वातावरण राहण्याच्या शक्यता

दि १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान थंडीच्या प्रमाणात वेगवेगळ्या भागात / ठिकाणी चढ उतार राहू शकतात, दिनांक २० नोव्हेंबर पासून पुढे काही दिवस थंडीचे काही प्रमाणात प्रमाण कमी राहू शकते.

हे आज रोजी दिसत असलेले अनुमान आहेत. वातावरनातील बदलांनुसार अनुमानांमध्ये बदल होऊ शकतात, होत असतात.

बागायती हरबरा पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येईल कोरडवाहू व बागायती परिस्थितीत अधिक उत्पादन देऊ शकणारे वान – विजय, जाकी ९२१८, बिडीयणजी ९९७, फुले विक्रम (कंबाइन हार्वेस्टर ने काढ़निस योग्य वाण). वोलिताच्या परिस्तितित अधिक उत्पादन देउ शकनारे वान- पीडिकेव्ही कांचन, पीडिकेव्ही कनक (कंबाइन हार्वेस्टर ने काढ़निस योग्य वाण).
बाग़ायती वेळेवर पेरणीचा गहु १५ नोव्हेंबर पर्यंत पेरता येईल, यासाठी एमएसीयस- 6478, फुले समाधान, एकेएडब्लू 3722, डिबिडब्लू 168, जिडब्लू ४९६, पोषण (बंसी) ई वाणांची निवड करता येईल.

पाऊस तीव्रता (मिमी)
हलका २.५ ते १५.५ .
मध्यम १५.६ ते ६४.४.
जोरदार ६४.४ ते ११५.५ मुसळधार११५.६ ते २०४.४
अतिवृष्टी २०४.४पेक्षा जास्त.

डॉ. भरत गीते,
डॉ. पं. दे. कृ. वि,
कृषी संशोधन केंद्र, वाशीम