आज-काल रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटत आहे. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील आढीव (ता. पंढरपूर) येथील भारत रानरूई यांनी देशी गायींचे संवर्धन करून आपली शेती समृद्ध बनविली. जुन्या रूढी व परंपरेतील विज्ञान शोधून त्याचा शेतीत केलेला वापर त्यांना फायदेशीर ठरला असल्याचे ते सांगतात.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी देशी गायींचे संवर्धन करत आहेत. घरातील दूधदुभते भागून छोट्या कुटुंबाचा प्रपंचही गायीवर चालत आहे. काही
शेतमजुरांनी दुसर्याच्या शेतात मोलमजुरी करून गायींचे संवर्धन केले आहे. वर्षाला खोंड विकून जमीनदार बनलेल्या काही व्यक्ती या जिल्ह्यात आहेत.
गायीमध्ये ३३ कोटी देव असून, वेगवेगळ्या देवतांनी गायीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपले स्थान निश्चित केल्याची लोकांची श्रद्धा आहे. जिज्ञासेपोटी आढीव (ता. पंढरपूर) येथील भारत श्रीपाद रानरूई यांनी याचा अभ्यास केला, तेव्हा या जुन्या रूढी व परंपरांमागे विज्ञान दडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रानरूई म्हणाले, गायीच्या शेणात लक्ष्मी आहे म्हणून ते शेण तिजोरीत ठेवायचे का? त्या शेणाचा आपल्या शेतीत प्रभावी वापर केल्यावर दर्जेदार उत्पादन व उत्पन्नाच्या माध्यमातून लक्ष्मी आपल्या घरात येत असते.
‘गोमुत्रामध्ये धन्वंतरी’ याचा अर्थ रोग निवारण करण्याची शक्ती गोमुत्रात असते, असे माझे ठाम मत आहे. या पद्धतीने रानरूई यांनी जुन्या रूढी-परंपरेतील विज्ञान शोधून त्याचे आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग केले.
खतांची झाली मोठी बचत
१९८४ साली रानरूई यांनी सर्वप्रथम देशी गायीच्या शेण व मुत्राची स्लरी बनविली. याचा वापर ते आपल्या शेतात प्रभावीपणे करत आले आहेत. त्यांचा हा ङ्गार्म्युला सबंध महाराष्ट्रात वापरला जात आहे. त्यांनी द्राक्षबाग लावल्यापासून एकदाही थेट
जमिनीतून रासायनिक खते दिली नाहीत. मात्र, कृषी विद्यापीठाने शिङ्गारस केलेल्या खत मात्रेच्या १० टक्के मात्रा स्लरीतून दिली जाते. त्यामुळे त्यांच्या बागेत दर्जेदार द्राक्ष तयार होत आहेत.
बेदाणाही दर्जेदार तयार होतो. त्यांच्या बेदाण्याला कोणत्याही बाजारपेठेत सर्वांत जास्त भाव मिळतो आहे. त्यांनी आपल्या शेतीला देशी गायींच्या
मलमुत्राचा जैविक खत म्हणून चांगला उपयोग केला. स्लरीच्या वापरामुळे प्रत्येक पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होत होती. याच काळात रानरूई यांनी स्लरीचा वापर केळीच्या पिकाला केला होता. बसराई केळीचा घड ६८ किलोचा निघाला होता. त्याचप्रमाणे त्यांनी आंबा, ऊस, कलिंगड, खरबूज, तुती आदी पिकाला स्लरीचा वापर केल्याने रासायनिक खतांची मोठी बचत झाली.
कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून गोमुत्राचा वापर
गोमुत्राचा वापर त्यांनी कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून केला. १ लिटर पाण्यात १० मि. लि. गोमूत्र टाकून त्याचा स्प्रे द्राक्षबागेला छाटणीनंतर ८० दिवस दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने दिला. त्यामुळे पानावर सौरजळ (सनस्ट्रोक) चे दुष्परिणाम आढळले नाहीत. त्यांच्या बागेत एकदाही ‘मिलीबग’ आला नाही. ‘भुरी’ जास्त काळ टिकून राहिली नाही. ‘भुरी’ची औषधे ङ्गार कमी मारावी लागली. बाग चांगली आल्याने लोक पाहायला येऊ लागले. त्यामुळे त्यांनी बनविलेल्या देशी गायीच्या मलमुत्राच्या स्लरीचा महाराष्ट्रात प्रसार झाला.
स्लरीचे पेटंट
सन २००० साली गुजरातमधील एका संस्थेने या स्लरीच्या पेटंटसाठी रानरूई यांचे नाव घेतले आहे. गुजरातमधील ङ्गर्टिलायझर व गुजरात ङ्गायनान्स कार्पोरेशनने अहमदाबाद येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविली होती. त्यात भारतातील नामवंत उद्योगपती, निवडक शेतकरी व शास्त्रज्ञांचा समावेश होता. या परिषदेनिमित्त प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये रानरूई यांनी दिलेल्या स्लरीची माहिती प्रसिद्ध केली आहे. तेव्हापासून
गुजरातमध्येही स्लरीचा वापर होऊ लागला आहे.
देशी गायींची जोपासना
देशी गायींच्या स्लरीचा शेतीला खूपच ङ्गायदा होऊ लागल्यामुळे रानरूई यांनी सुरुवातीला २ ‘गवळावू’ गायी विकत घेतल्या. त्यांचा सांभाळ त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. आज त्यांच्याकडे
लहान-मोठ्या सुमारे १४ गायी आहेत. यामध्ये १२ ‘गवळावू’ तर २ ‘खिल्लार’ जातीच्या गायी आहेत. मुक्त गोठा असूनही ते गायींना शेतामध्ये चरण्यासाठी सोडतात. ज्वारीचा कडबा, हिरवा चारा म्हणून मकवन व लसूण घास देतात. मका व गहू भुशीचा भरडा आणि अर्धा किलो शेंग पेंड असा दोन किलोचा खुराक रोज दिला जातो.
गांडूळ निर्मिती
रानरूई यांनी देशी गायींचे २० किलो शेण, पाव किलो तूप, अर्धा किलो मध एकत्र केले. तयार झालेले मिश्रण २०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रात टाकले. दोनच महिन्यांत तेथे गांडुळांची निर्मिती झाली. दूध वाढीसाठी त्यांनी सन २००३ मध्ये एक प्रयोग केला. त्यांची एक ‘गवळाऊ’ गाय एकावेळी ङ्गक्त दीड लिटर दूध देत होती. दुसर्या वेताला त्यांनी त्या गायीची धार न काढता झालेल्या कालवडीला पूर्ण दूध पाजले. याचा परिणाम चांगला झाला. सुमारे दोन वर्षांनी वासरू गाभण गेले आणि ते व्याल्यानंतर एकावेळी सुमारे ३ लिटर दूध देऊ लागले. अशा पद्धतीने तिसरी पिढी तिप्पट दूध देत असल्याचा त्यांना अनुभव आहे. या प्रयोगासाठी त्यांना भारतीय किसान संघाचे संघटनमंत्री दादा लाड यांचे मार्गदर्शन लाभले. देशी गायीमुळे शेतीचे संपूर्ण चित्र बदलले म्हणून रानरूई यांची शेती पाहण्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री गोविंदराव अधिक, अमरावती येथील सेंद्रिय शेतीचे तज्ज्ञ सुभाष पाळेकर व आजरा येथील देशी गायींचे प्रचारक मोहन देशपांडे, ‘ग्रामपरिवर्तन’चे शितोळे व त्यांचे सहकारी, महाराष्ट्र शासनाचे कृषी खात्याचे माजी सचिव डॉ. सहारिया आदींनी भेटी दिल्या आहेत. रानरूई यांची प्रेरणा घेऊन माळशिरसचे ‘कृषिभूषण पुरस्कार’ प्राप्त शेतकरी सुरेश वागदरे, पंढरपूरचे डॉ. शीतल शहा व कोर्टीचे संजय ताठे अशा अनेक शेतकर्यांनी देशी गायींचे संवर्धन केले असल्याचे रानरूई यांनी सांगितले. देशी गायींचे संवर्धन व त्याचा शेतीमध्ये योग्य वापर
केल्यामुळे रानरूई यांची शेती सुजलाम् सुङ्गलाम् झाली आहे. गोसंवर्धनामुळेच त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी झाला आणि शेती समृद्ध बनली आहे.