मॉन्सून परततोय; पुढील दोन दिवस १२ जिल्ह्यात मुसळधार

औरंगाबाद ता. ११ : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  मान्सून दरवर्षी 17 सप्टेंबरच्या सुमारास परतीचा प्रवासाला निघतो. मात्र यंदा 6 पासूनऑक्टोबर तो सुरु होत आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 08 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान हवामान खात्यानं पुढील दोन दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सातारा, सांगली कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असणार आहे.

सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. या भागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर या दोन्ही विभागांमध्ये हवामान कोरडे होणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र आणखी दोन दिवस विजांच्या कडकडाटात पावसाचे सावट कायम राहणार आहे. काही भागांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसांनंतर मात्र या विभागांतही पाऊस विश्रांती घेणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

पावसामूळे सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी पावसाची उघाड बघून करून घ्यावी. काढणी शक्यतो सकाळी लवकर सुरू करून ढीग तयार करून सायंकाळपूर्वी तो झाकून ठेवावा म्हणजे संध्याकाळी पडणाऱ्या पावसामूळे सोयाबीन  भिजणार नाही.पावसामूळे खरीप ज्वारी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

पावसामूळे बाजरी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.पावसामूळे ऊस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.पावसामूळे हळद पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पावसामूळे संत्रा/मोसंबी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे.पावसामूळे डाळींब बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे.पावसामूळे चिकू बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे.