भारतात रुग्ण (covid 19) बरे होण्याचा सध्याचा दर 97.77%
भारतात गेल्या 24 तासात लसींच्या 75,57,529 मात्रा, (covid 19 vaccination in India) देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 82.65 कोटींपेक्षा अधिक मात्रा (82,65,15,754 ) देण्यात आल्या आहेत. एकूण 81,05,030 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या, वयोगटानिहाय एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत पुढीलप्रमाणे लसींच्या मात्रांचा समावेश आहे-
HCWs | 1st Dose | 1,03,69,831 |
2nd Dose | 87,67,189 | |
FLWs |
1st Dose | 1,83,46,681 |
2nd Dose | 1,46,16,924 | |
Age Group 18-44 years |
1st Dose | 33,47,62,522 |
2nd Dose | 6,47,24,317 | |
Age Group 45-59 years |
1st Dose | 15,29,73,905 |
2nd Dose | 7,07,83,297 | |
Over 60 years |
1st Dose | 9,79,37,287 |
2nd Dose | 5,32,33,801 | |
Total | 82,65,15,754 |
गेल्या 24 तासात 34,167 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,27,83,741
रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.77%.झाला आहे.रूग्ण कोविडमुक्त होण्याचा सध्याचा दर मार्च 2020 पासूनच्या सर्वाधिक उच्च स्तरावर आहे.
केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 86 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे.
गेल्या 24 तासात 26,964 नव्या रुग्णांची नोंद झाली
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,989 आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.90% आहेत.
देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 15,92,395 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 55.67 कोटींहून अधिक (55,67,54,282) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.08% असून गेले 89 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.69% इतका आहे.दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 23 दिवस 3% पेक्षा कमी आणि 106 दिवस 5% पेक्षा कमी आहे.