उद्या १० वीचा निकाल जाहीर होणार

राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मुंबई, पुणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर यासह राज्यातील सर्वच बोर्डांचा निकाल एकाचवेळी जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

जून महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १२ वीचा निकाल १५ जुलै पर्यत तर १० वीचा निकाल ३१ जुलैपर्यत जाहीर करणार असल्याचे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्यावतीने जाहीर केले होते. त्यानुसार १२ वीचा निकाल नियोजित वेळेपेक्षा १ दिवस उशीराने जाहीर झाला. मात्र १० वीचा निकाल ३१ जुलै पूर्वी जाहीर करण्यात शालेय शिक्षण विभागाला यश आले आहे.

यंदा एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहवीची परीक्षा दिली होती. यामध्ये विद्यार्थी – ९ लाख ७५ हजार ८९४, विद्यार्थिनी – ७ लाख ८९ हजार ८९४, तृतीयपंथी विद्यार्थी – ११०, अपंग विद्यार्थी – ९ हजार ४५ यांचा समावेश आहे. तर, संवेदनशील केंद्रांची संख्या ८० होती.

विभागनिहाय विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे –
पुणे : २ लाख ८५ हजार ६४२ विद्यार्थी, नागपूर : १ लाख ८४ हजार ७९५ विद्यार्थी, औरंगाबाद : २ लाख १ हजार ५७२ विद्यार्थी, मुंबई : ३ लाख ९१ हजार ९९१ विद्यार्थी, कोल्हापूर : १ लाख ४३ हजार ५२४ विद्यार्थी, अमरावती : १ लाख ८८ हजार ७४ विद्यार्थी, नाशिक : २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी, लातूर : १ लाख १८ हजार २८८ विद्यार्थी, कोकण : ३५ हजार ६३७ विद्यार्थी.

 या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार

mahresult.nic.in

mahahsscboard.maharashtra.gov.in,