देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 30,570 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.64%

भारतात, गेल्या 24 तासात 64,51,423 लसींच्या मात्रा, पात्र नागरिकांना देण्यात आल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारतात आतापर्यंत एकूण कोविड-19 लसीकरणाच्या  76.57 कोटीपेक्षा जास्त मात्रा (76,57,17,137) देण्याचा टप्पा ओलांडला आहे. एकूण 77,22,914 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार गटनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे-

 

HCWs 1st Dose 1,03,65,645
2nd Dose 86,41,364
 

FLWs

1st Dose 1,83,40,334
2nd Dose 1,42,03,101
 

Age Group 18-44 years

1st Dose 30,91,72,935
2nd Dose 4,88,51,566
 

Age Group 45-59 years

1st Dose 14,62,56,729
2nd Dose 6,50,07,644
 

Over 60 years

1st Dose 9,45,11,108
2nd Dose 5,03,66,711
Total 76,57,17,137

 

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 64.5 लाखांहून अधिक लसींच्या मात्रांचे वितरण

गेल्या 24 तासात 38,303 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,25,60,474 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून बरे होण्याचा दर  97.64%.इतका झाला आहे.

 

 

सलग  81  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वयित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात देशभरात 30,570 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,42,923 आहे.उपचाराधीन रुग्ण, त्यांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.03% इतके आहे.

 

 

देशात चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासात 15,79,761 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत एकूण 54.77 कोटीहून अधिक  (54,77,01,729) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.93% असून गेले 83 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.94% असून गेले 17 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आणि 100 दिवसांपासून   5% पेक्षा कमी आहे.