कृषीक्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रक्रियेत, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरूच राहणार असून, त्यायोगे शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह टोमर यांनी आज दिली. नवी दिल्लीत कृषी भवन इथे, सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयाने खाजगी कंपन्यांशी पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सिस्को, निंजाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) या खाजगी कंपन्यांशी हे करार करण्यात आले आहेत.
या प्रायोगिक प्रकल्पांनंतर, शेतकऱ्यांना शेतात कुठली पिके लावायची, कोणत्या प्रकारची बियाणे वापरायची, जास्तीत जास्त पीक येण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, अशा सगळ्या प्रश्नांवर, तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती पुरवली जाईल. या माहितीच्या आधारे ते अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्णय घेऊ शकतील. कृषी पुरवठा साखळी उद्योगात असलेले लोकही त्यांच्या खरेदीविषयक तसेच मालाच्या ने-आण साठीची लॉजिस्टीक व्यवस्था याविषयी अचूक आणि नेमका निर्णय घेऊ शकतील. त्याशिवाय, आपल्या पिकांची विक्री करायची की साठा ठेवायचा याचा निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी हवामानाची पूर्वसूचनाही याच तंत्रज्ञानातून मिळू शकेल.
केंद्र सरकारने वर्ष 2021 -2025 या कालावधीसाठी डिजिटल कृषी अभियान सुरु केले आहे. याअंतर्गत, होणाऱ्या प्रकलपांमध्ये मुख्यत: नवे तंत्रज्ञान- जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञान, ड्रोनचा वापर रोबो यांचा वापर करता येईल. कृषी मूल्यसाखळी आता पिकांच्या निवडीपासून पीक व्यवस्थापन आणि विपणनापर्यंत विस्तारली आहे. कृषी कष्टरत परिवर्तन घडवून आणण्याच्या कुठल्याही प्रयत्नात, आता अशाप्रकारे विचार करणारी व्यवस्था आणण्यासाठी या सरकारी-खाजगी भागीदारीचा उपयोग होणार आहे.
पाचही सामंजस्य करारांची थोडक्यात माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा