मागणी आणि पुरवठ्यामधील तफावतीमुळे, देशात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलांपैकी सुमारे 60% तेलाची मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते.या संबंधित करारानुसार, इंडोनेशिया आणि मलेशिया येथून आयात करण्यात येणाऱ्या एकूण खाद्यतेलाच्या आयातीत सुमारे 54% पाम तेलाचा समावेश आहे. तर अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सुमारे 25% सोयाबीन तेल आयात केले जाते. आयात करण्यात येणाऱ्या सूर्यफूल तेलाचे प्रमाण 19% असून प्रामुख्याने हे तेल युक्रेनमधून आयात केले जाते.
मध्यम मुदतीच्या कराराअंतर्गत खाद्यतेलांच्या उत्पादनाला अत्यंत उच्च प्राधान्य दिले जात आहे, हे 91 लाख मेट्रिक टना वरून 101 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलेल्या मोहरी तेलाच्या यंदाच्या सर्वाधिक उत्पादनातून हे प्रतिबिंबित झाले आहे.
पाम तेल (कच्चे आणि शुद्ध ) च्या आयातीबाबत, जुलै, 2021 च्या 5.65 लाख मेट्रिक टन या तुलनेत ऑगस्ट 2021 मध्ये आयातीचे प्रमाण 7.43 लाख मेट्रिक टन होते. प्रामुख्याने अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे ऑगस्टमधील पामतेल आयातीची टक्केवारी मागील जुलै महिन्याच्या तुलनेत 31.50% ने वाढली आहे.
तपशील खालील तक्त्यामध्ये दर्शवला आहे :
ImportofPalm Oil(LMT) | ||||||||||
Oil | Nov-20 | Dec-20 | Jan-21 | Feb-21 | Mar-21 | Apr-21 | May-21 | Jun-21 | Jul-21 | Aug-21 |
CrudePalmOil | 6.14 | 7.64 | 7.51 | 4.51 | 4.74 | 6.73 | 7.47 | 5.84 | 5.46 | 5.27 |
RBDPalmolein | 0.15 | 0.06 | 0.02 | 0.061 | 0.026 | 0.004 | 0.0022 | 0.02 | 0.19 | 2.16 |
TotalPalmOil Imports | 6.29 | 7.7 | 7.53 | 4.571 | 4.766 | 6.734 | 7.4722 | 5.86 | 5.65 | 7.43 |
ऑगस्ट महिन्याशी तुलना केल्यास वर्षानुवर्षे असेच दिसून आले आहे की, 2019, 2020 आणि 2021 मध्ये पाम तेलाची एकूण आयात (कच्चे आणि शुद्ध) अनुक्रमे 8.81 एलएमटी , 7.48 एलएमटी आणि 7.43 एलएमटी होती जी अजूनही अर्थव्यवस्थेच्या नेहमीच्या मागणीपेक्षा कमी आहे.
ImportofPalm Oil(LMT) | |||
Oil | Aug-19 | Aug-20 | Aug-21 |
CrudePalmOil | 5.78 | 7.48 | 5.27 |
RBDPalmolein | 3.03 | -* | 2.16 |
TotalPalmOil Imports | 8.81 | 7.48 | 7.43 |
खाद्यतेलांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, खाद्यतेलांचे उत्पादन,आयात आणि किंमती यावर दररोज बारकाईने लक्ष ठेवले जाते. शेतकरी, उद्योग आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, खाद्यतेलसह कृषी मालाच्या किंमती आणि उपलब्धतेवर बारकाईने देखरेख ठेवण्यासाठी अन्न मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली कृषी-वस्तूंसंदर्भात एक आंतर-मंत्रालयीन समिती आहे.देशांतर्गत उत्पादन, मागणी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किंमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार परिणामांवर अवलंबून असलेल्या खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांच्या संबंधित उपायोजना करण्याच्या अनुषंगाने ही समिती किंमतीच्या परिस्थितीचा साप्ताहिक आढावा घेते. किमती स्थिर राहिल्या पाहिजेत आणि आंतरराष्ट्रीय किंमतीच्या चढउतारांच्या मर्यादेत ग्राहकांचे हित सुरक्षित राहील हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून गेल्या वर्षी योग्य वेळी हस्तक्षेप करण्यात आले.