देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 37,875 नवे रुग्ण आढळले

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 70.75 कोटी मात्रांचा टप्पा

आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात कोविड-19  प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत (covid 19 vaccination in India)  गेल्या 24 तासात 78,47,625  मात्रा देण्यात आल्यामुळे एकूण मात्रांची संख्या 70.75 कोटी (70,75,43,018) वर पोहचली आहे. एकूण 72, 81,305 सत्रांच्या माध्यमातून या  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

आजसकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –

 

HCWs

1st Dose 1,03,61,652
2nd Dose 85,19,178
 

FLWs

1st Dose 1,83,32,680
2nd Dose 1,37,23,058
 

Age Group 18-44 years

1st Dose 28,18,69,377
2nd Dose 3,73,18,560
 

Age Group 45-59 years

1st Dose 13,91,24,251
2nd Dose 5,97,18,690
 

Over 60 years

1st Dose 9,08,69,866
2nd Dose 4,77,05,706
Total 70,75,43,

केंद्र सरकार कोविड –19 लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशभरात त्याचा  विस्तार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 39,114 रूग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची (साथीच्या प्रारंभापासून) एकूण संख्या 3, 22, 64,051 वर गेली आहे.

परिणामी, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.48% झाला आहे.

सलग  73   दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 37,875 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  3, 91, 256. असून  एकूण बाधित रुग्णांच्या 1.18% आहे.

कोविड-19  चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 17, 53, 745  चाचण्या करण्यात आल्या. देशाने आतापर्यंत 53.49  कोटीहून अधिक (53,49,43,093) चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.49% असून गेले 75  दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.16 % असून हा दर गेले 9 दिवस 3% पेक्षा कमी  तर गेले 93 दिवस  5% पेक्षा कमी आहे.