भारतातील लसीकरणाने 58.25 कोटींचा टप्पा पार केला

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,33,924 

आज सकाळी 8 वाजता आलेल्या अहवालानुसार भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण आता 58.25 कोटींचा (58,25,49,595) टप्पा पार करत आहे. यासाठी 64,69,222 सत्रे आयोजित करण्यात आली होती.

आज सकाळी 8 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीचा ताळेबंद पुढीलप्रमाणे आहे:

HCWs 1st Dose 1,03,53,405
2nd Dose 82,15,000
FLWs 1st Dose 1,83,04,397
2nd Dose 1,25,74,264
Age Group 18-44 years 1st Dose 21,69,00,386
2nd Dose 1,94,77,956
Age Group 45-59 years 1st Dose 12,26,16,599
2nd Dose 4,87,88,970
Over 60 years 1st Dose 8,33,38,747
2nd Dose 4,19,79,871
Total 58,25,49,595

देशातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा आवाका व वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 44,157 रुग्ण रोगमुक्त झाले असून या महामारीची सुरुवात झाल्यापासून रोगमुक्त झालेल्यांची संख्या आता 3,16,80,626 झाली  आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर मार्च 2020 पासून सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजेच 97.63 % आला आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त व अथक  प्रयत्नांमुळे नवे रुग्ण आढळण्याचा दैनंदिन दर गेले सलग 57 दिवसांमध्ये 50,000 पेक्षा खालीच राहिला आहे.

गेल्या 24 तासांत 25,072 नवीन रुग्ण आढळले, ही गेल्या 160 दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी आहे.

देशभरातील कोविड चाचण्यांची क्षमता सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत 12,95,160 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत भारताने एकूण 50,75,51,399 चाचण्या केल्या आहेत.

चाचण्यांची क्षमता वाढवत असतानाच , साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर गेल्या 59 दिवसांतील सर्वात नीचांकी पातळीवर म्हणजे 1.91% पर्यंत आला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 1.94% पर्यंत खाली आला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेल्या 28 दिवसांत 3% च्या खालीच राहिला असून गेल्या सलग 77 दिवसांत तो 5% च्या खाली राहिला होता.