देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत देशात काल 16 ऑगस्ट 2021 रोजी सुमारे 88 लाखाहून अधिक (88,13,919) मात्रा, पात्र नागरिकांना देण्यात आल्या.
लसीकरणाचा सध्याचा टप्पा जाहीर करताना 7 जून 2021 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पात्र नागरिकांना लस घेण्याचे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. कोविड-19 महामारीविरोधातल्या लढ्यात जनतेच्या भारत सरकारवरच्या विश्वासाची प्रचीतीच आजच्या कामगिरीवरून येत आहे. देशव्यापी लसीकरण अभियानाचा देशभरात वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर 15 दिवस आधीच दृष्टीक्षेप आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.
88.13 लाख मात्रा दिल्याने एकूण लसीकरण 55.47 कोटी (55,47,30,609) झाले आहे. प्रौढ भारतीयांपैकी 46% जणांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा तर 13% प्रौढांना लसीच्या दोन्ही मात्रा प्राप्त झाल्या असून कोविड-19 पासून संरक्षण मिळाले आहे.
- गेल्या 24 तासांत 88.13 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या; आतापर्यंत एका दिवसात देण्यात आलेल्या सर्वाधिक लसींच्या मात्रा
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशभरात लसीच्या 55.47 कोटी मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासात देशात 25,166 नव्या रुग्णांची नोंद; गेल्या 154 दिवसांतील सर्वात कमी रूग्णसंख्या
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या, एकूण रुग्णांच्या 1.15%; हा दर मार्च 2020 पासून सर्वात कमी पातळीवर
देशात उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,69,846; गेल्या 146 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.51%; हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वात अधिक दर आहे
देशात आतापर्यंत एकूण 3,14,48,754 कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 36,830 रुग्ण कोविडमुक्त झाले
गेल्या 53 दिवसांपासून साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 3% हून कमी, सध्या हा दर 1.98 %
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.61 %; गेल्या 22 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे
चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ – आतापर्यंत देशभरात एकूण 49.66 कोटी चाचण्या करण्यात आल्या