कृषीसल्ला : दिनांक 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट, 2021

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

उपग्रहाच्या आधारे मिळालेल्या माहितीनूसार सध्या मराठवाडयात बाष्पोतसर्जानाचा वेग वाढलेला दिसून येत आहे, याचाच परिणाम म्हणजे वातावरण दमट होते अशा वातावरणात किडींचा व रोगाचा प्रादूर्भाव वाढतो.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. कापूस पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मागील काहि दिवसापासून पावसाने दिलेली उघाड व ढगाळ वातावरण असल्यामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बूप्रोफेझीन 25% 400 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत.तूर पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. तूर पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.मुग/उडीद पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. सध्याचे दमट व ढगाळ वातावरण यामुळे मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करावी. मुग/उडीद पिकात पानांवरील ठिपके (सर्कोस्पोरा लिफ स्पॉट) रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भूईमूग पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. भूईमूग पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.मका पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मका पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या केळी बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. केळी बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. आंबा बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या द्राक्ष बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. द्राक्ष बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. सिताफळ बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. सध्याच्या दमट व ढगाळ वातावरणामूळे टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

नविन लागवड केलेल्या फुल पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. फुल पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळाऋतूमध्ये सर्वसाधारणपणे किटक वर्गीय माशांचा प्रादूर्भाव पशूधनामध्ये आढळत आहे यामध्ये डास, क्यूलीकॉईडस ई. किटकांचा प्रादुर्भाव तसेच हिमॅटोबिया व घरगूती माशंचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. म्हणून पशुधनावरती 5% निंबोळी अर्क ताजा तयार करून फवारणी करावी तसेच गोठ्यामध्ये सर्वत्र फवारणी करावी.

सामुदासिक विज्ञान

पावसाळयात आंबा, कलींगड, खरबूज आणि फणस यांसारख्या फळांचा आहारात समावेश करणे टाळावे, आणि भरपूर प्रमाणात इतर फळे जसे की, केळी, पेरू, सफरचंद, चेरी, जांभूळ, संत्रा, मोसंबी, लिंबू आणि आवळा खावेत.

सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी