रोगमुक्तीचा दर सध्या 97.35%
भारतातील लसीकरण मोहिमेत कोविड प्रतिबंधक लसीच्या 47 कोटी 22 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, आतापर्यंत 55,99,690 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 47,22,23,639 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 17,06,598 मात्रा देण्यात आल्या.
या एकूण मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:
HCWs | 1st Dose | 1,03,11,380 |
2nd Dose | 78,56,466 | |
FLWs | 1st Dose | 1,79,78,353 |
2nd Dose | 1,13,65,816 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 15,70,22,578 |
2nd Dose | 88,94,835 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 10,65,50,619 |
2nd Dose | 3,94,29,559 | |
Over 60 years | 1st Dose | 7,61,31,656 |
2nd Dose | 3,66,82,377 | |
Total | 47,22,23,639 |
देशात 21 जून 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,08,57,467 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 36,946 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे रोगमुक्ती दर 97.35% झाला आहे.
भारतात गेल्या 24 तासांत, 40,134 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
गेले सलग छत्तीस दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 4,13,718 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.31% इतके आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 14,28,984 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशात 46 कोटी 96 लाखांहून अधिक (46,96,45,494) चाचण्या करण्यात आल्या.
देशभरात एकीकडे कोविड चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.37% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.81% इतका आहे. आता सलग 56 दिवस दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 5% हून कमी राहिला आहे.