देशात गेल्या 24 तासांत 41,649 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या (4,08,920) सध्या एकूण बाधितांच्या संख्येच्या 1.29%

भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 46 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 54,94,423 सत्रांद्वारे कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 46,15,18,479 मात्रा (covid 19 vaccination) देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 52,99,036 मात्रा देण्यात आल्या.

दिल्या गेलेल्या एकूण मात्रा पुढीलप्रमाणे :

HCWs 1st Dose 1,03,02,313
2nd Dose 78,22,150
FLWs 1st Dose 1,79,32,882
2nd Dose 1,12,50,974
Age Group 18-44 years 1st Dose 15,22,17,587
2nd Dose 80,61,768
Age Group 45-59 years 1st Dose 10,44,37,699
2nd Dose 3,84,29,220
Over 60 years 1st Dose 7,49,29,832
2nd Dose 3,61,34,054
Total 46,15,18,479

 

​​​​​

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,07,81,263 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 37,291 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे सकल रोगमुक्ती दर 97.37 % झाला आहे.

गेल्या 24 तासांत भारतात, 41,649 नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली.

रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग 34 दिवस, 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 4,08,920 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.29 % इतके आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 17,76,315 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 46.64 कोटींहून अधिक (46,64,27,038) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.42 % आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.34% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सलग 54 दिवस 5% हून कमी राहिला आहे.