रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 %
भारतातील कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने काल 45 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, एकूण 54,11,501 सत्रांमध्ये 45,07,06,257 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 43,92,697 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
यामध्ये समाविष्ट –
HCWs | 1st Dose | 1,02,96,166 |
2nd Dose | 77,71,787 | |
FLWs | 1st Dose | 1,79,14,176 |
2nd Dose | 1,10,81,579 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 14,68,84,314 |
2nd Dose | 72,09,744 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 10,30,99,861 |
2nd Dose | 3,68,42,675 | |
Over 60 years | 1st Dose | 7,43,50,754 |
2nd Dose | 3,52,55,201 | |
Total | 45,07,06,257 |
21 जून 2021 पासून कोविड – 19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
महामारीच्या प्रारंभीच्या काळापासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,07,01,612 जण पूर्वीच बरे झाले आहेत आणि 38,465 रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 %
इतका आहे.
गेल्या 24 तासात 43,509 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.
सलग 32 दिवस 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 4,03,840 आहे आणि देशातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या ती 1.28% इतकी आहे.
चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करीत, देशभरात गेल्या 24 तासात 17,28,795 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत भारताने 46 कोटींपेक्षा अधिक (46,26,29,773) चाचण्या केल्या आहेत.
एकीकडे देशभरात चाचणी क्षमतेत वाढ करण्यात आली आहे, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.38% आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.52% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सलग 52 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.