निर्गोपचारांशी संबंधित संघटना एनआयसीई( नेटवर्क ऑफ इन्फ्युएन्झा केअर एक्स्पर्ट्स), ने काही दिशाभूल करणारे दावे केले असून त्यातील तथ्यांविषयी काहीही शहानिशा न करता, हे दावे काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशितही केले आहेत.
पहिला दावा हा आहे की त्यांनी कोविड उपचार पद्धती बाबत एक प्रमाणित कार्यानव्यन प्रोटोकॉल विकसित केला असून, आयुष मंत्रालयाने जो मंजूरही केला आहे.
असा दावा करणाऱ्यांनी अनैतिकपणे आयुष मंत्रालयाची मान्यता असल्याचे दिशाभूल करणारा दावा केला आहे. आयुष मंत्रालय NICE च्या या दाव्याचे पूर्णपणे खंडन करत असून यासंबंधीचे वृत्त देखील फसवे आहे.
आयुष मंत्रालया पुढे हे ही स्पष्ट केले आहे की ही संघटना, म्हणजेच NICE ने अशा कुठल्याही प्रोटोकॉलसाठी आयुष मंत्रालयाकडे अर्ज केलेला नाही. कोविड-19 शी संबंधित उपचार/व्यवस्थापनाबाबत कोणताही प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर झाला, तर त्यावर आंतरशाखीय तंत्रज्ञान आढावा समितीकडून सखोल अभ्यास केला जातो. या समितीत कोणत्याही उपचारांना मंजुरी देण्यासाठी, अशा अध्ययनासाठी मान्यताप्राप्त आणि कठोर वैज्ञानिक चाचण्यांची पद्धत अवलंबली जाते. या समितीच्या मंजुरीशिवाय, आयुष वैद्यकीय शाखेशी संबंधित कोणतीही संस्था असे प्रोटोकॉल विकसित करण्याचा दावा करु शकत नाही. त्यामुळे असा दावा करत NICE ने अत्यंत अनैतिक, अवैध आणि निराधार कृत्य केले आहे. तसेच, मंत्रालयाच्या परवानगीशिवाय मंत्रालयाचा नावाचा वापर करणे हा देखील अत्यंत गंभीर गुन्हा आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या 2020 च्या आदेशानव्ये ( 40-3/2020-DM-II) NICE ने केलेल्या अशा खोट्या दाव्यांबद्दल, त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
या आदेशानुसार, असे दावे देशात कोविडची साथ पसरवण्यासाठी कारणीभूत ठरु शकत असल्याने हा एक दंडात्मक गुन्हा ठरु शकतो.काही प्रसारमाध्यमांनी देखील NICE च्या दाव्याची शहानिशा न करता, त्याला प्रसिद्धी दिली आहे.
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN) पुणे,ने देखील हे स्पष्टपणे म्हटले आहे की NICE ने काही मोठे आणि दिशाभूल करणारे दावे केले आहेत. कोविड उपचार/ व्यवस्थापणाविषयी प्रोटोकॉल तयार असून त्याला आयुषची मान्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
इथे हे ही नमूद करायला हवे की, एनआयएन, पुणे ही आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत संस्था असून, कोविड प्रतिबंध/उपचार/ व्यवस्थापनाबाबत आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे ही संस्था काटेकोरपणे पालन करते, एवढेच नाही, तर या मार्गदर्शक तत्त्वांचा प्रसार-प्रचारही करते.
सविस्तर संदर्भासाठी-लिंकवर क्लिक करा कोविड 19 उपचारासाठी,एन आय सी ई ने केलेल्या नियमांबाबतच्या माध्यमातल्या वृत्ताचे खंडन