कृषी हवामान सल्ला : दि. २४ ते २८ जुलै २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात  दिनांक 24 जूलै रोजी हलका तर इतर दिवशी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 28 जूलै ते 03 ऑगस्ट, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीएवढे राहण्याची,  किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे.  सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर 0.5 ते 1.0 % फेरससल्फेटची  पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड (II) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास व जमिनीत वापसा आल्यास फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील खोडमाशी व पाने खाणाऱ्या अळया यांच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा इथिऑन 50% 15 मिली प्रति 10 लिटर पाणी प्रमाणे प्रति एकर करिता 300 मिली  किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% (संयुक्त किटकनाशक) 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी प्रमाणे प्रति एकर करिता 50 मिली किंवा क्लोरँन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाणी प्रमाणे प्रति एकर करिता 60 मिली  पावसाने उघाड दिल्यास व जमिनीत वापसा आल्यास फवारणी करावी.जास्त पाऊस झालेल्या भागातील खरीप ज्वारी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे.  जास्त पाऊस झालेल्या भागातील बाजरी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे.  जास्त पाऊस झालेल्या भागातील ऊस पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे.जास्त पाऊस झालेल्या भागातील हळद पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे. हळद पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर 0.5 ते 1.0 % फेरससल्फेटची  पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड (II) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास व जमिनीत वापसा आल्यास फवारणी करावी. हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैवीक बुरशीचा 4 किलो प्रति एकर जमिनीतून वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील संत्रा/मोसंबी बागेत साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्‍य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास व जमिनीत वापसा आल्यास फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील डाळींब बागेत साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे.जास्त पाऊस झालेल्या भागातील  चिकू बागेत साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे.

भाजीपाला

जास्त पाऊस झालेल्या भागातील भजीपाला पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. गादीवाफ्यावर लागवड केलेल्या रोपवाटीकेतील रोपांना बुरशी नाशकाची  आळवणी करावी. भाजीपाला पिकात शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सायंकाळी  किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतामध्ये एकरी 2 किलो मेटाल्डिहाईडचे दाणे पसरून टाकावे.

फुलशेती

जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

जास्त पाऊस झालेल्या भागातील चारा पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे.

तुती रेशीम उद्योग

तुती लागवड करण्यासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.25 पर्यंत असावा. पाण्याचा निचरा होणारी हलकी मध्यम व काळी-भारी जमिन तुती लागवडीसाठी चांगली असते. काळया भारी जमिनीत चिकण मातीचे प्रमाण जास्त असल्यामूळे पाण्याचा निचरा होत नाही. तुती लागवडीत पाणी साठून राहिल्यास मुळकुंज व पानावरील रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. म्हणून तुती बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. बेणे तयार करून रोपवाटिका वाफे तयार करावेत व बेणे लागवड करावी. बेण्यास 0.2 टक्के कार्बेन्डेझीम बुरशीनाशकाची 15 मिनीट बुडवून प्रक्रिया करून लागवड करावी.

 सामुदायिक विज्ञान

घरातील कामे अतिशय झपाट्याने, विश्रांती न घेता केल्यास गृहिणीला लवकर थकवा येतो. म्हणून काम सुरूवातीपासून योग्य प्रमाणात आणि योग्य वेगाने करत गेलात तर फारसा थकवा जाणवत नाही.

 (सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)