दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर च्या वतीने “आषाढी एकादशी” निमित्त 20 जुलै 2021 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपुरच्या युट्युब वाहिनीवर या कार्यक्रमांचे थेट प्रसारण करण्यात आले.
सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार श्रीमती संज्योत केतकर यांचे कीर्तन सादर झाले. ”देव पहाया गेलो। देवची होऊन गेलो।“ आणि “अशी भक्ती कान्होपात्रेने केली” या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कथा सादर केल्या. “अगा वैकुंठीच्या राया म्हणत संत कान्होपात्रा सायुज्य मुक्तीला पात्र ठरली” ही सुंदर भक्तीमय रचनाही त्यांनी सादर केली.
दुपारी 1.00 वाजता सगळ्यांना भक्तीरंगात दंग करणाऱ्या “अभंगवाणी” या कार्यक्रमाद्वारे बालकलाकारांनी भक्तीगीते आणि नृत्य सादर केली. नागपूरच्या सोहम कलाविष्कार या संस्थेने हा सुंदर कार्यक्रम सादर केला. मैत्रेय मोहरील, अक्षय चारभाई, निधी रानडे, अथर्व लुलेकर, आयुषी देशमुख, स्वरदा कोरान्ने, सान्वी मास्टे, नंदिनी गडकरी या बालगायकांचा यात समावेश होता.आनंद मास्टे, रघुवीर पुराणिक, ऐश्वर्या महानाईक, सोहम रानडे , निनाद गडकरी या वादक कलाकारांनी या कार्यक्रमाला संगीत साज चढवला. श्री गजानन रानडे आणि स्नेहल रानडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
दुपारी 3.30 वाजता “पाऊले चालती पंढरीची वाट” या अभंग/ भक्तिगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “जाता पंढरीसी सुख वाटे जीवा”, “विट्ठल आवडी प्रेमभाव”, “विठाई विठाई”, “पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी” “बोलावा विठ्ठल ” यांसारखे मंत्रमुग्ध करणारे अभंग/भक्तिगीते सादर झाली. वर्धा जिल्ह्यातील संस्कार भारतीच्या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमात केतकी कुलकर्णी, नितिन वाघ, अनघा रानडे, कवी नेसन आणि अमीत लांडगे यांनी आपल्या गायनाने वातावरण भक्तीमय केले.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरशी संबंधित सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी आणि सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी फेसबुकवर https://www.facebook.com/SCZCC/ , ट्विटरवर https://twitter.com/SCZCC आणि इन्स्टाग्रामवर https://www.instagram.com/sczcc.culture/?hl=en, युट्युब वाहिनी https://www.youtube.com/user/sczcc ला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा. यासोबतच केंद्राची युट्युब वाहिनी बघण्यासाठी खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करा.
आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे की, जास्तीत जास्त लोकांनी हे ऑनलाईन कार्यक्रम पाहून आनंद घ्या , निरोगी राहा, सुरक्षित रहा . धन्यवाद