कृषी सल्ला : पुढील पाच दिवसात मराठवाडयात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

14 जूलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसात मराठवाडयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 व 14 जूलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसात मराठवाडयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत वापसा येताच बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पुढील पाच दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणर नाही याची दक्षता घ्यावी.

मराठवाडयात पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर (औरंगाबाद जिल्हा : गंगापूर, खूलताबाद, कन्नड ; बीड जिल्हा : पाटोदा, शिरूर कासार ; जालना : घनसावंगी ; लातूर जिल्हा : रेणापूर,  शिरूर अनंतपाल; नांदेड जिल्हा : नांदेड ; उस्मानाबाद : उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा ) जमिनीत वापसा येताच बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 18 जूलै ते 24 जूलै, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्ष कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

लागवड न केलेल्या भागात कापूस पिकाची लागवड 15 जुलैपर्यंत करता येते. लागवड न झालेल्या ठिकाणी लागवडी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत वापसा येताच बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी. मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता लागवड केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.पेरणी न केलेल्या भागात तुर पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत वापसा येताच बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची पेरणी करावी. मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच जमिनीत वापसा येताच बिजप्रक्रिया करूनच मका पिकाची पेरणी करावी. मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता केळी बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता आंबा बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता द्राक्ष बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता सिताफळ बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.

भाजीपाला

पुर्नलागवडीस तयार असलेल्या टोमॅटो, मिरची, वांगी इत्यादी भाजीपाला पिकांची जमिनीत वापसा येताच पुर्नलागवड करावी. मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजी पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.

फुलशेती

पुर्नलागवडीस तयार असलेल्या झेंडू, शेवंती, जिलारडीया इत्यादी फुल पिकांची जमिनीत वापसा येताच पुर्नलागवड करावी. मागील काही दिवसात झालेल्या पावसामूळे व पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता लागवड केलेल्या फुल पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. फुलपिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

पुढील पाच दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता पशुधनास पाऊस सुरू असताना उघड्यावर बांधू किंवा चरावयास सोडू नये. पावसाळयात गोठ्याची स्वच्छता, मलमूत्राचा निचरा व गोठ्यात कोठेही दलदल होणर नाही याची काळजी घ्यावी. पशुधनाची पचन क्रिया बिघडून आजारी पडण्याचे व पोटफुगीची अवस्था टाळण्यासाठी खाद्य म्हणून 100% हिरवा चारा देण्याचे टाळावे. हिरव्या चाऱ्यासोबतच पशूखाद्यात योग्य प्रमाणात कोरडा चारा असावा.

सामुदासिक विज्ञान

गडद लाल गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्यापासून कापडे रंगवणे : गुलाबाची फुले वाळल्यानंतर फुलांचा चुरा, पाणी, रेशीम आणि सुती कापड, एका स्टीलच्या पातेल्यात टाकून रंगविण्यासाठी मध्यम आचेवर 20 मिनीट उकळवून घेवून ते द्रावण थंड झाल्यानंतर रंगविलेल्या कापडाला स्वच्छ पाण्यात धुवून सावलीत वाळवावे. रंगविलेल्या कापडाचा रंग पक्का करण्यासाठी, तुरटीची भूकटी गरम पाण्यात विरघळून घ्यावी, त्यात रंगविलेले रेशीम व सुती कापडाला 15 मिनीटे  भिजवून ठेवावा, रंग पक्का आणि गडद गजगा रंग विकसीत होतो. त्यामूळे गडद लाल गुलाबाच्या पाकळ्या कचऱ्यात न टाकता जपून ठेवून आल्या घरातील रूमाल, साडी, ओढण्या रंगविण्यासाठी उपयोग करू शकतो. अशा प्रकारे आपण घरी बसून एक गृह उद्योग करून आपले उत्पन्न वाढवू शकतो.

( सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )