शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पुढील पाऊल टाकावे

पीक परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी आगामी पावसाचा अंदाज घेऊनच, आवश्यक पेरणी करावी. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी कृषि अधिकारी यांनी  शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. युरिया व खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवल्यास आगामी काळात त्याचा तुटवडा भासणार नाही, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री  श्री. भुजबळ यांनी यावेळी केल्या आहेत.

लग्न सोहळ्यांत गर्दी होत असेल तर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी

नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करताना गर्दी करू नये. यासारख्या सोहळ्यांमुळे रुग्ण अधिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असून पोलीस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे, जास्त गर्दी होत असेल तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक स्वामी रिसॉर्ट, लासलगाव येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.