शेतकऱ्यांसाठी सुरू केले आत्मनिर्भर कृषी ॲप

सरकारच्या विविध विभागांनी काळजीपूर्वक तयार केलेला माहितीचा खजिना असून वेगवेगळ्या मंचावर  उपलब्ध आहे, मात्र शेतकऱ्यांना समजू शकेल अशा पद्धतीने तो नाही. किसानमित्र हा  राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो शेतकऱ्यांना  मदत करतो,  भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो), राष्ट्रीय जल सूचना विज्ञान केंद्र (एनडब्ल्यूआयसी) आणि इतर विविध सरकारी मंत्रालये / विभागातील आकडेवारी एकत्रित करून आणि आत्मनिर्भर  कृषी ॲपमार्फत ते शेतकर्‍यांना उपलब्ध करून देऊन ही पोकळी भरुन काढतो.

“स्थानिक उत्पादन, बाजारपेठ व पुरवठा साखळीला मदत करण्यासाठी  आणि महामारीमुळे प्रभावित झालेले शेतकरी व स्थलांतरित कामगार यांना सक्षम बनवण्यासाठी एक मजबूत यंत्रणा निर्माण करण्यासाठी केंद्र  सरकारने अविरत कार्य केले आहे. किसानमित्र उपक्रमाच्या आत्मनिर्भर कृषी ॲपमुळे शेतकऱ्यांच्या हातात  आयएमडी, इस्रो, आयसीएआर, आणि सीजीडब्ल्यूए या आपल्या  संशोधन संस्थांनी तयार केलेली पुरावा  आधारित माहिती उपलब्ध असेल. ही माहिती, जेव्हा शेतकऱ्यांकडून पिकांची निवड,  लहान शेतकर्‍यांच्या साधनांचे  यांत्रिकीकरण किंवा पेंढा जाळणे याबाबत  निर्णय घेण्यासाठी  वापरली जाईल तेव्हा हे सुनिश्चित केले जाईल की पाणी आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती मूलभूत फोनवर उपलब्ध असलेल्या ॲप मध्ये असून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान सर्वसमावेशकताही वाढेल,” असे केंद्र  सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन यांनी हे ॲप सुरु करताना सांगितले.