पुढील पाच दिवसात औरंगाबाद व जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाचा तर बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात औरंगाबाद व जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाचा तर बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 जून ते 06 जूलै, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनबिजप्रक्रिया करुनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. खरीप ज्वारी पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करुनच खरीप ज्वारी पिकाची पेरणी करावी.पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करुनच बाजरी पिकाची पेरणी करावी.वेळेवर लागवड केलेल्या ऊस पिकात हेक्टरी 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश प्रति हेक्टर खतमात्रा देऊन पक्की बांधणी करावी.वेळेवर लागवड केलेल्या हळद पिकातील तणांचे व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फुलधारणेसाठी खत व्यवस्थापन वेळेवर व शिफारस केलेल्या मात्रेनुसार करावे. बागेत 13:00:45 20 ग्रॅम प्रति लिटर पावसाने उघाड दिल्यास स्टीकर सह फवारणी करावी. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. मृग बहार डाळींब बागेत तण नियंत्रण करावे. बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी पावसाने उघाड दिल्यास करावी. बागेतील फुटवे काढावेत.चिकू बागेतील तणांचे व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी सकाळी लवकर करावी. गादी वाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना आवश्यकतेनूसार झाऱ्याने पाणी घालावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या मोगरा फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.
चारा पिके
पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून बिजप्रक्रिया करुनच चारा पिकाची पेरणी करावी.
तुती रेशीम उद्योग
बदल ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र राज्यात सोयाबिन लागवडी खालील क्षेत्र 15 ते 20 लक्ष हेक्टर ने वाढले आहे. परभणी, नांदेड, हिंगोली व जालना या जिल्हयातील शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये थोडासा बदल करून कापुस व सोयाबीन खालील क्षेत्रा एवजी 1 ते 1.5 एकर तुती लागवड करावी. शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत एकरी 3.28 लक्ष अनुदान तुती लागवडीसाठी असून पोकरा योजनेअंतर्गत तुती लागवडीसाठी एकरी 2 लक्ष पर्यंत अनुदान आहे. दुसऱ्या वर्षापासून इतर पीकाच्या तुलनेत रेशीम कोषाचे एकरी तिन लक्ष उत्पन्न मिळते. 1.5 एकर पासून कमित कमी 5 लक्ष प्रति वर्ष कोषाचे उत्पन्न मिळते. रेशीम उद्योगातून एक हेक्टर क्षेत्रातून 12 लोकांना वर्षभर रोजगार अपलब्ध होतो.
सामुदायिक विज्ञान
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला लगेच अंघोळ घालणे त्याच्या स्वास्थासाठी धोकादायी असल्याने कुटुंबियांनी त्याला सुरुवातीच्या 6 तासात अंघोळ घालने पूर्णत: टाळून पुढील 24 तासानंतर डॉक्टरी सल्ल्यानूसार अंघोळ घालावी.
सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी