परादीप फॉस्फेट्स घेणार झुआरी ऍग्रोचा झुआरीनगर कारखाना

झुआरी ऍग्रो केमिकल्स लि. चा झुआरीनगर कारखाना परादीप फॉस्फेट्स लि.ने घेण्यास सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने परवानगी दिली आहे.

झुआरी ऍग्रो केमिकल्स लि.(झेडएसीएल) चा गोव्यातील झुआरीनगर येथील कारखाना परादीप फॉस्फेट्स लि. (पीपीएल) ने घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. झेडएसीएलच्या झुआरीनगर कारखान्याचा युरिया आणि बिगर-युरिया खतनिर्मितीचा व्यवसाय सदर मालकी-हस्तांतरणामुळे पीपीएल संपादन करणार आहे.

ऍडव्हेंट्झ समूहाचा भाग असणारी पीपीएल, प्रामुख्याने बिगर-युरिया खतांच्या – डाय-अमोनिअम फॉस्फेट (डीएपी) व नत्र-स्फुरद-पलाश (एनपीके) खतांच्या- उत्पादन व विक्रीच्या व्यवसायात स्थिरावली आहे. तसेच ही कंपनी म्युरिएट ऑफ पोटॅशची आयात व विक्रीही करते.

झेडएसीएल ही पब्लिक लिस्टेड कंपनीही त्याच म्हणजे ऍडव्हेंट्झ समूहाचा भाग आहे. भारतात खतांचा विकास आणि उत्पादन हा तिचा प्रमुख व्यवसाय आहे. गोव्यातील झुआरीनगर येथील खरखान्यात ही कंपनी युरिया आणि बिगर-युरिया खतांचे उत्पादन करते.

सीसीआयचा सविस्तर आदेश काही काळाने अपेक्षित आहे.