शेतकरी मित्रांनो योजनांचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

शासनाने शेतकऱ्यांसह विविध लाभार्थी गटासाठी वेळोवेळी उपयुक्त योजना राबविलेल्या आहेत. सध्या खरीप हंगाम सुरु असल्याने शेतकर्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. कृषी पंढरी पोर्टलने वेळोवेळी अशा योजना संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. त्यांचाही संदर्भ घेता येईल.

कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी यंत्र सामग्री व उपकरणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना खरेदीसाठी 50 टक्के अर्थसहाय्य तर अन्य शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान सुरू केले आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेतमजुरांची टंचाई व शेतीतील कामे कमी खर्चात व जलद गतीने होण्याच्या दृष्टीने या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकऱ्यांनी कृषीविषयक कोणत्याही योजनेसाठी https:/mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घ्यावा.

 

वरील संकेतस्थळावर गेल्यावर काही सूचना पाळाव्या लागतात, त्या अशा.

सूचना

  • कृपया आपला वर्तमान मोबाइल नंबर आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे याची खात्री करा
  • आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
  • आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
  • प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
  • लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
  • जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, “पासवर्ड विसरला” बटणावर क्लिक करा
  • जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, “वापरकर्ता नाव विसरला” बटणावर क्लिक करा